कुस्तीचे माहेरघर म्हणजेच देऊळगाव माळी सतिश मवाळ मेहकर तालुक्यातील प्रति पंढरपूर तसेच जिल्ह्यातील कुस्तीचे माहेरघर समजले जाणारे देऊळगाव माळी येथे व्यायाम शाळेचे भूमिपूजन सोहळा माजी सरपंच अशोकराव गाभणे यांच्या हस्ते संपन्न झाला. ही व्यायाम शाळा क्रीडा खात्यामार्फत खेचून आणण्याचे श्रेय हे सरपंच किशोर गाभने यांना जाते. हा भूमिपूजन सोहळा गेल्या 25 वर्षापासून क्रांतीसुर्य तालीम संघाच्या मार्फत क्रीडा क्षेत्रात काम करणारे किसनराव बळी यांनी स्थापन केलेल्या क्रांतीसुर्य तालीम संघाच्या मैदानावर सदर व्यायाम शाळेचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच किशोर गाभणे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष रिसोड अरुण मगर, ग्रामविकास अधिकारी म्हस्के,संदीप इंगोले,अभिमन्यू इंगोले,कुस्तीपटू डोंगरदिवे, विश्वनाथ पैलवान,विजय मगर, उपसरपंच रंगनाथ चाळगे,शेषराव बापू सुरूशे, बी.के.सुरूशे व आदी मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभली. त्याचबरोबर क्रांतीसुर्य तालीम संघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किसनराव बळी, भास्कर ठेकेदार,हरिभाऊ पाटील, गणेश गाभणे, रवींद्र पाटील, रोहिदास डोंगरे,अरुण बळी, विशाल मगर,रवींद्र पुरी, दत्ता तायडे, दीपक काळे, अनिल मगर, गणेश गिरी,संदीप गवळी, रामा येलकर,आदी मंडळींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुले शाहू आंबेडकर विचारवंत विजय राजगुरू यांनी केले तर आभार प्रदर्शन हरिभाऊ पाटील यांनी मानले.गावातील तरुणांसाठी येत्या काळामध्ये सदरील वायम शाळेला आठ लाख रुपये पर्यंतचे साहित्य तसेच संपूर्ण मैदानाची सपाटीकरण करून संरक्षण भिंत बांधून व्यायाम शाळा व्यवस्थित करू.
सरपंच किशोर गाभणे दे.माळी
Users Today : 1