दिपक मापारी, रिसोड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात यावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे वतीने देण्यात आला..जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील खरात, प्रसिद्धीप्रमुख गजानन खंदारे, सहसचिव रुपेश बाजड, विवेकानंद ठाकरे, संतोष भाऊ चराटे ,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष गोपाल पाटील खडसे, बालाजी खरात, अमोल उगले ,शिवाजी देशमुख ,गजानन गरकळ ,परमानंद कोकाटे, गणेश नाईकवाडे, घनश्याम खडसे, अनिल खरात, यांच्यासह रिसोड तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अजित शेलार यांना निवेदन दिले की गेल्या आठ दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे शेतातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झालेले आहे. काही सोयाबीनला कोंब आलेले आहे तरी शासनाने यांचा त्वरित सर्वे करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अन्यथा. संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल..
Users Today : 1