प्रतिनिधी :विशाल गवई अकोट अकोट तालुक्यातील आकोलखेड येथे ११ ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे नदीला पूर आल्याने .गावातील नदीकाठी असलेले बेघर लोकांचे घर वाहून गेले. गावातीलच विश्वानगर परिसरातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या गावातील नदीवर जो पूल बांधल्या गेला होता..त्या पूलाची उंची ही कमी असल्यामुळे तो पूल खचला आहे.उंचीवर जर पूलाचे बांधकाम केले असते.तर पाणी अडले नसते.पूलाला पाणी अडल्यामुळेच गरिब बेघर लोकांचे घर वाहून गेल्याचे चित्र आहे. व नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे घरात पाणी शिरले त्यामुळे नागरिकांची दानादान उडाली.पुलाचे बांधकाम हे पहिल्याच पाण्यात पूल खचल्याचे चित्र आहे.अशी अवस्था निर्माण होणार नाही अशे निवेदन ग्रामविकास अधिकारी नालिंदे यांना देण्यात आले .यावेळी समाज क्रांती आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे, युवराज यादवार,पियुष बिजणे, आकाश मुऱ्हेकार,रहिमभाई कुरेशी, रामदास येले,इरशाद टेलर,विष्णू लांडे,जावेद खान आदी उपस्थित होते.
Users Today : 15