श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव साजरी करणार अनाथ मुलींची दिवाळी व भाऊबीज

Khozmaster
1 Min Read

संतांचे दर्शन घेवू या मामाच्या गावाला जावु या”अकोट प्रतिनिधी विशाल गवई श्री. गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव विश्वस्त मंडळाकडून दरवर्षी प्रमाणे भक्तांच्या मदतीतून निराधार, अनाथ मुला, मुलींचा एक दिवस आनंदात जावो. याकरिता अल्पसः प्रयत्न म्हणून अकोल्यातील बालीकाश्रमातील बालींकासोबत दिवाळी साजरी करण्याचे योजीले आहे.    मुंडगाव येथे या बालीकांसोबत दि. 30 ऑक्टोबर २०२२ रविवार रोजी भाऊबीज कार्यक्रम सोहळा आयोजीत करीत आहोत. या मुलींच्या हातुन भाऊबीज ओवाळणी करण्यात येईल व या निमित्ताने त्यांना नित्य उपयोगी वस्तू, रेडिमेड कपडे व भेट वस्तू , सोबत दिवाळी फराळाचे डब्बे हे दानशूर भक्तांच्या सहयोगातून देण्यात येतील. मागील वर्षी आपण प्रचंड सहकार्य केले आहे. तरी यावेळी सुद्धा भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन विलास हि. बहादुरे (अध्यक्ष), गणेश गो. ढोले (उपाध्यक्ष ), शरद र. सोनटक्के (सचिव), विजय दा. ढोरे (कोषाध्यक्ष), डॉ. प्रवीण उ. काळे (सहसचिव), महेश म.गाढे (व्यवस्थापक), राजेश दि.खोकले (विश्वस्त), ज्वारसिंग प्र. आसोले (विश्वस्त) यांनी केले आहे.

 

0 9 4 6 0 1
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *