चिखली तालुक्यातील अनेक काँग्रेस सरपंचाचा भाजपा पक्ष प्रवेश मुंबई: आतापर्यत जे जे अशक्य वाटत होते ते ते भारतीय जनता पक्षाने शक्य करुन दाखविले. राम मंदिराचे काम सुरू झाले , 370 कलम रद्द केले, बुलेट ट्रेनच्या माध्यमातून आणि देश भरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनवून भारताला एक नवी दिशा दिली . भारतीय जनता पक्षाच्या पंत प्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिकडे तिकडे विकासाचे नवनवीन मैलाचे दगड उभारणे सुरु आहे. केंद्रा प्रमाणेच राज्यातही भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे सरकार येऊन काही महिनेच झाले तरी सुद्धा विकासाच्या कामांनी प्रचंड वेग घेतलेला आहे. शेतकरी , कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय घेऊन युती सरकार सर्व सामान्य माणसाचे सरकार असल्याचे सिध्द होत आहे. अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकशात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना हजारों कोटींची आर्थिक मदत देण्यात आली आहे. भाजपा जवळ जनहित आणि लोकोपयोगी कामे करण्याची दृष्टी असल्याने राज्य प्रगती कडे वाटचाल करित असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिखली तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक सरपंच, उप सरपंच सोसायटी संचालक यांच्या भारतीय जनता पक्ष प्रवेशा वेळी केले. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश वेळी सहकार मंत्री अतुलजी सावे, भाजपा सरचिटणीस विक्रांत पाटील यांची उपस्थिती होती.
भारतीय जनता पक्षात मान, पान , सन्मान आणि विकास कामही मा.सों .श्र्वेता ताई महाले पाटील भारतीय जनता पक्ष हा सुसंस्कृत पक्ष असून कोणत्याही प्रकारचा जाती भेद न करणारा पक्ष आहे. सबका साथ, सबका विकास हा मुल मंत्र घेउन केंद्रात पंत प्रधान नरेन्द्र मोदी साहेब ना अमित शहा आणि राज्यात उपमुख्य मंत्री ना देवेंद्र फडणवीस साहेब , चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुशल नेतृत्वात केंद्र आणि राज्य सुद्धा प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत करीत आहे . माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील अनेक सरपंचांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते प्रवेश घेतलेला आहे त्यांना भारतीय जनता पक्षात मान, पान , सन्मान आणि विकास कामेही मिळेल असे आश्र्वासन यावेळी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी दिले.
आमच्या तीन पिढ्या काँग्रेसच्या पण आता भाजपात विकासासाठी प्रवेश करणखेड सरपंच गजानन गायकवाड माझे आजोबा काँग्रेसचे माझे वडील काँग्रेसचे, आमचे पूर्ण घराणं काँग्रेसचं .काँग्रेसमध्ये आमच्या तीन पिढ्या खपल्या. परंतु काँग्रेस ने किंवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मतदार संघाचा विकास केला नाही. माजी आमदाराने तर काहीच केले नाही . आमच्या गावचा कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही .आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी गत दोन वर्षांमध्ये ज्या पद्धतीने विकासाचा झंजावात मतदारसंघांमध्ये आणलेला आहे तो पाहता गावाच्या विकासासाठी आम्ही तीन पिढ्यांचे काँग्रेसचे असताना सुद्धा आज भाजपामध्ये प्रवेश घेत असल्याचे प्रतिपादन करणखेड चे सरपंच गजानन गायकवाड यांनी यावेळी केले. तसेच एकलारा सरपंच सौ संगिता पवार यांनी सुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. दि १४ ऑक्टो, २०२२ चिखली तालुक्यातील एकलारा येथील काँग्रेसच्या सौ संगीता पवार, सरपंच शेलोडी समाधान रेठे ,सरपंच करणखेड गजानन गायकवाड , शिंदी हराळी सरपंच प्रमोद सपकाळ ,डोगरगाव ग्राम पंचायत माजी सरपंच पांडुरंग दांदडे , रामेश्वर दांदडे , तंटामुक्ती अध्यक्ष अमोल दांदडे यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश केला आहे. त्यांच्या समवेत ग्राम पंचायत सदस्य संगीता पवार , रूपाली पवार, मीनल पवार, कुंदन पवार, श्र्वेता तोंडे, अशोक तोंडे , वासुदेव गावंडे सोसायटी संचालक वसंत गावंडे सोसायटी संचालक ,योगेश आटोळे ग्रामपंचायत सदस्य ,प्रकाश खेडेकर ,भास्कर दांदडे समाधान धुमाळ ,अरुण पाटिल यावेळी डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष ,प्रा वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारणी सदस्य , अनमोल ढोरे पाटील तालुका उपाध्यक्ष भाजपा बळिराम काळे भाजप नेते, बंडू आंभोरे जिल्हा सचिव युवा मोर्चा,, तेजराव पाटिल लक्ष्मण राव रिंढे, दिपक शेळके उपस्थित होते
Users Today : 16