नांदुरा शहर भाजपा महिला मोर्चा च्या वतीने ‘दिव्य महाआरती ‘ तथा विविध आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न

Khozmaster
2 Min Read

नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : संपूर्ण जगामध्ये भारताला शक्तिशाली व महत्त्वपूर्ण देशांच्या यादीमध्ये समाविष्ट करून भारताला सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम व सामर्थ्यशाली बनविण्याचे स्वप्न बघणारे व ते पूर्णत्वास नेण्यासाठी अथक व अविरत परिश्रम करणारे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या निःस्वार्थी सेवाकार्यातून प्रेरणा घेऊन विविध सामाजिक, लोकोपयोगी व आध्यात्मिक उद्दिष्ट्ये साध्य करीत भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा मा. सौ. उमाताई खापरे,मा. जिल्हाध्यक्षा सौ. सिंधुताई खेडेकर, लोकनेते तथा माजी आमदार श्री चैनसुखजी संचेती, सामाजिक कार्यकर्ते तथा मा. शहराध्यक्ष श्री श्यामभाऊ राखोंडे यांच्या मार्गदर्शनात व ज्येष्ठ समाजसेविका तथा मा. शहराध्यक्षा सौ. सारिकाताई राजेश डागा यांच्या संकल्पनेतुन नांदुरा शहरामध्ये विविध समाजाभिमुख, लोकोपयोगी, कल्याणकारी व विविध आध्यात्मिक कार्यक्रम राबविले जात असून या उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लाभ होऊन सकारात्मक परिवर्तन घडून येत आहे._देशाचे मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संपन्न झालेल्या महाकाल मंदिर कोरिडॉर लोकार्पण कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य भाजपा महिला मोर्चा च्या मा. प्रदेशाध्यक्षा सौ. उमाताई खापरे यांच्या आदेशानुसार नांदुरा शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने मंगळवार दि. ११/१०/२०२२ रोजी शहरातील जंगली महाराज महादेव मंदिर येथे विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाच्या अंतर्गत भव्य दिव्य महाआरती, अभिषेक, ओम नमः शिवाय जप, महामृत्युंजय जप आदी आध्यात्मिक कार्यक्रम घेण्यात येऊन उपस्थितांचे दिशादिग्दर्शन करण्यात आले._

_यावेळी सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या नांदुरा शहर भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. सारिकाताई राजेश डागा, भाजपा महिला मोर्चा जिल्हा सचिव सौ. अनिताताई चौधरी,भाजपा महिला मोर्चा शहर उपाध्यक्षा सौ. शोभाताई देशमुख, बेटी बचाव बेटी पढाव नांदुरा संयोजिका सौ. ज्योतीताई तांदळे, भाजपा महिला मोर्चा सोशल मिडिया संयोजिका सौ. रेणूताई डागा, भाजपा महिला मोर्चा सदस्या सौ. सिंधूमतीताई राखोंडे,सौ. राधाताई राखोंडे, राष्ट्र सेविका समितीच्या सौ विद्याताई वाणी सौ स्मिताताई कुलकर्णी सौमंदाताई देशपांडे नांदुरा भाजप शहराध्यक्ष श्री श्यामभाऊ राखोंडे, नांदुरा शहर भाजपा सरचिटणीस श्री राजेशभाऊ डागा, शहर सचिव श्री ब्रह्मानंदभाऊ चौधरी,भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव श्री रामसिंग ठाकूर यांच्यासह नांदुरा शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, बंधु-भगिनी, कार्यकर्ते व शहरातील असंख्य जेष्ठ व इतर नागरिक उपस्थित होते._

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *