प्रतिनिधी,प्रतिनिधी -दत्ता हांडे दे राजा
मुंबई नागपूर दुतगती समृद्धी महामार्ग लगत पाणी सुरक्षा भिंतीच्या आत जाऊन शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्या .
शेती खरडून गेली. दोन वर्षापासून शेतकऱ्याचे अगोदरच बेहाल आहे, यावर्षी पाऊस पाणी चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी चांगले बियाणे भरपूर महागडे खते शेतीत वापरली, अतिवृष्टीमुळे काही शेती दल दलने खराब झाली, तर काही शेतकऱ्यांची शेती समृद्धी महामार्गाच्या पाण्याने पिके वाहून गेली टाकलेली शेण खते रासायनिक खते वाहून गेली, पाण्याचा प्रभाव इतका तीव्र होता की वळण फुटले बांधोरे तुटले सुरक्षा भिंत तोडून ठेकेदारांनी पाणी शेताच्या बाहेर काढण्याचा निष्फळ प्रयत्न केला शेतकऱ्यांनी मदतीसाठी पोलीस स्टेशन कडे धाव घेतली आहे गट नंबर 273 भगवान गबाजी चिपाटे, गजानन भगवान चिपाटे, विठ्ठल भगवान चिपाटे, सत्यवान भगवान चिपाटे, भानुदास माऊली भानुसे, दत्तात्रय भानुसे ,पिंटू मुंढे ,कारभारी चौरे फौजी, गौतम मस्के यांची शेकडो एकर शेती पाण्याने प्रभावित झाली .मोका स्थळ पाहणी करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची विनवणी आहे. शेतकऱ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी समृद्धी मार्ग बनण्यासाठी शेती दिली. त्याच शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी आज रस्ता नाही पूल करून खालचा रस्ता वापरण्यासाठी द्यावा अशी या शेतकऱ्यांची ओरड आहे. शेवटी सरकार मायबाप शेतकऱ्यांसाठी काय करेल हे सुधारणा झाल्यावरच समजेल. दुष्काळात तेरावा महिना समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पीडित झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा व नुस्कान भरपाई करावी अशी मागणी आहे.