दिपक मापारी, रिसोड
रिसोड येथील तहसील कार्यालय मध्ये कार्यरत असलेले नायब तहसीलदार नप्ते यांच्यावर नियमानुसार कारवाई करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक सतीश इरतकर यांनी तक्रार द्वारे केली आहे..
तक्रारीत नमूद केले आहे की नायब तहसीलदार नप्ते हे मागील काही वर्षापासून कर्तव्यावर आहेत.
नप्ते यांच्याकडे सामान्य नागरिक कोणतेही काम घेऊन गेल्यास येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी उद्धटपणे वागून कोणतेही काम करीत नाही. त्यांच्या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या सामान्य नागरिकांची कोणतीही समस्या एकून न घेता नायब तहसीलदार नप्ते हे वाद करत असतात व उद्धट वागणूक देतात. तसेच येणारा शेतकरी वर्ग गोरगरीब,श्रमजीवी, तसेच वकील वर्ग सामान्य नागरिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी या सर्वांशी नायब तहसीलदार नप्ते यांची असलेली वागणूक ही अतिशय त्रासदायक असून त्यांच्या वाईट वागणुकीमुळे सामान्य जनता ही त्रस्त झाली आहे. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर बाबीची दखल घेऊन रिसोड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नप्ते यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच रिसोड तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक सतीश इरतकर यांनी दिलेल्या तक्रार जात नमूद केलेले आहे. या तक्रार अर्जावर अनेक सामान्य नागरिकाच्या स्वाक्षऱ्या आहेत..
Users Today : 1