नंदुरबार,धडगाव पं.स सभापती, उपसभापतींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार :,धडगाव पंचायत समितीच्या नवनियुक्त सभापती व उपसभापतींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.       नंदुरबार व धडगाव पंचायत समितीवर बाळासाहेबांची शिवसेनेने झेंडा फडकवलेला आहे.गुरूवारी झालेल्या निवडणुकीत नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतीपदी माया ताराचंद माळशे तर उपसभापतीपदी शितल धर्मेंद्र परदेशी तसेच धडगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी हिराबाई रवींद्र पराडके तर उपसभापतीपदी भाईदास अत्रे विजयी झाले. बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी भेट घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंचायत समितीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना योजनांच्या लाभ देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.    कोणताही घटक योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी.जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेनेकडून लोकोपयोगी कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.      यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग ठाकरे, उद्योगपती ताराचंद माळसे, धर्मेंद्र परदेशी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 

0 9 4 9 5 9
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *