जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न.

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी,प्रविण चव्हाण; 

नंदुरबार – : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आज जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हा पोलीस मुख्यालयातील गंधर्व हॉल येथे संपन्न झाले . या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले . यावेळी उपजिल्हाधिकारी कल्पना निळ – ठुबे , राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक दिलीप मंडल , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे , विद्यार्थी विकास अधिकारी डॉ . माधव कदम , राष्ट्रीय सेवा योजनाचे समन्वयक डॉ . विशाल करपे , कार्यक्रम अधिकारी डॉ . मनोज शेवाळे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सल्लागार सुनिल गायकवाड , मुख्याध्यापक डी . डी . साळुंके उपस्थित होते . खत्री म्हणाल्या की , नैसर्गिक धोक्यांमुळे उद्भवलेल्या आपत्तीचा दरवर्षी लाखो लोकांवर परिणाम होतो . त्यामुळे आपत्ती पुर्व तयारी पुर्ण क्षमतेने केल्यास व जोखीम घटक , धोके कमी केल्यास आपत्तीच्या वेळी होणारे नुकसान कमी होऊन आपत्तीचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो . त्यामुळे जागतिकस्तरावर आपत्ती धोके निवारण दिन म्हणून आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन दरवर्षी १३ ऑक्टोंबर रोजी सादर केला जातो . प्रास्ताविकांत बोलतांना श्री . बोरसे म्हणाले की , नंदुरबार जिल्ह्यात यावर्षांपासून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपदा मित्र योजना राबविण्यात येत आहे . यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील होमगार्ड , एन.एस.एस. , एन.सी.सी. नेहरू युवा केंद्र , भारत स्काऊट गाईड तसेच ग्रामीण युवकांमधून १८ ते ४० वयोगटातील स्वयंसेवकाची निवड करुन त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे पुर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक साधनांची किट देण्यात येणार हे किट संबंधित ग्रामपंचायतीत ठेवण्यात येणार आहे . जिल्ह्यातील ‘ आपदा मित्रांसाठी नोंदणी केलेल्या सर्व स्वंयसेवकांना आज प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दल , धुळे मार्फत प्रथमोपचार , शोध व बचाव या विषयावर प्रशिक्षण होमगार्ड , एन.एस.एस. एन.सी.सी , नेहरू युवा केंद्र , भारत स्काऊट गाईड , ग्रामीण युवकांना देण्यात आले .

या कार्यशाळेस डॉ . व्ही . झेड . चौधरी , डॉ . दिनेश देवरे , डॉ . उपेंद्र धगधगे , जिल्हा युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अर्थ कौशिक उपस्थित होते .

 

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *