घरफोडीच्या गुन्ह्यातील 03 आरोपींना न्यायालयाने ठोठावला 2 वर्ष सश्रम कारावास … !!

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी,प्रविण चव्हाण; नंदुरबार –:धडगांव येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील 03 आरोपींना न्यायालयाने ठोठावला 2 वर्ष सश्रम कारावास .

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 28 सप्टेंबर2021 रोजी चे सायंकाळी पाच ते 29 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी दहा वाजेच्या .

दरम्यान धडगांव येथील पोस्ट ऑफिस च्या दरवाजाचे कुलूप तोडून ऑफिस मधील पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचे कंपू सि. पी. यु , मॉनीटर , माऊस , की – बोर्ड व बार कोड स्कॅनर असा मुद्देमाल चोरी झाल्याने राजाराम सुरसिंग सोनी (वय -56 वर्षे) रा . वरुळ कानडी ता . शहादा जि . नंदुरबार यांनी दिलेल्या तक्रारी वरून धडगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 369/2021 भा.द.वि. कलम 457,380,34 प्रमाणे. 29 सप्टेंबर 2021 रोजी अश आरोपीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता .

सदर गुन्ह्यात आरोपी योगेश्वर ऊर्फ भुऱ्या केशवलाल चव्हाण (वय -32), विक्रम ऊर्फ विक्या रोहिदास पावरा (वय -22) दोन्ही रा . वडफळ्या ता . धडगांव जि . नंदुरबार, निलेश धना वसावे (वय19) रा . वरखेडी ता . धडगांव जि . नंदुरबार यांना दि. 01ऑक्टोंबर 2021 रोजी तात्काळ अटक करून आरोपींच्या ताब्यातून 2500, रुपये किमतीचे एक मॉनीटर , की – बोर्ड व एक माऊस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता .

धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र भुमा जाधव यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्दतीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते .

तसेच गुन्हा दाखल झाल्या नंतर तिन्ही आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी , धडगांव दीपक कंखरे यांचे न्यायालयात 48 दिवसातच सादर केले होते .

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी , धडगांव यांनी साक्षीदारांचे जबाब , पंच , आणि परिस्थिती जन्य पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष या सर्व बाबींचा विचार करुन आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असतांनाच खटला चालविण्याचे ठरविले ( Under Trial ) . JMFC धडगांव दीपक कंखरे यांनी जलदगतीने खटला चालवुन खटल्याची सुनावणी पुर्ण करुन आरोपी, योगेश्वर ऊर्फ भुन्या केशवलाल चव्हाण (वय 32,) विक्रम ऊर्फ विक्या रोहिदास पावरा (वय -22 )दोन्ही रा . वडफळ्या ता . धडगांव जि . नंदुरबार, निलेश धना वसावे (वय 19) रा .वरखेडी ता .धडगांव जि . नंदुरबार यांना 02 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे .

सदर गुन्ह्याचा तपास नंदुरबार पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे , धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांचे मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र भुमा जाधव यांनी केला असून न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षा तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड . बी . आर . वळवी यांनी पाहिले होते . पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार समाधान केंद्रे यांनी कामकाज केले आहे .

तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच विशेष सरकारी वकील यांचे,

नंदुरबार पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी अभिनंदन केले आहे .

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *