कृषी प्रोडूसर कंपनीचा विदर्भात डंका!
जानेफळ – जानेफळ येथील विदर्भ समृध्दी कृषी प्रोडूसर कंपनीचा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सन्मान केला. १३ ऑक्टोबर रोजी पुणे येथे महा एफ पी सी ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी विदर्भातून क्रमांक एक ची कामगिरी केल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. यावेळी महा एफ पो सी पुणे चे एमडी योगेश थोरात, संचालक सुधीर इंगळे, विठ्ठल पिसाळ, दास राव पाटील तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत यंदा विदर्भ समृद्धी कृषी प्रोडूसर कंपनीच्या जानेफळ खरेदी केंद्रावर एकूण २५०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. विदर्भात उच्चांकी अशी ४४ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली होती व सर्वच शेतकऱ्याचे पैसेही वेळेत अदा करण्यात आले. कंपनीच्या या उत्कृष्ट कार्याचा गौरव केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केला. यावेळी कंपनीचे संचालक संतोष साखरे, मोहन धोटे, अमोल माडोकार, सौ. सोनाली धोटे, सौ. संगीता साखरे यांचा सन्मान करण्यात आला.