बाबासाहेबांची धम्मक्रांती ऐतिहासिक – बाबुराव सिरसाट

Khozmaster
1 Min Read

अकोट :विशाल गवई ; १३ ऑक्टोबर १९३५ ला नाशिकच्या येवला भूमीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली.व सर्व धर्माचा अभ्यास करून तब्बल एकविस वर्षांनी बाबासाहेबांनी नागपूरच्या पावन भूमीत १४ ऑक्टोबर १९५६ ला बौध्द धम्माची दीक्षा घेऊन आपल्या लाखो अनुयायांना सुध्दा दीक्षा दिली.बाबासाहेबांची धम्मक्रांती ऐतिहासिक असे प्रतिपादन बाबुराव सिरसाट यांनी आपल्या भाषणात बोलताना केले.

१४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता आकोलखेड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर्हू कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले नंतर सामुहिकरीत्या बुद्ध वंदना घेण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रफुल्ल जवादे हे होते.तर बाबुराव सिरसाट हे प्रमुख मार्गदर्शक होते.उमेश खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रतन खैरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अक्षय सिरसाट,विशाल नगराळे,अमोल वानखडे,प्रकाश वंडकार,अमरदिप शंभरकार,मुकेश सिरसाट,करुणेश मोहोड,रंजित वासेकर,सुहास किटके,सोहम वासेकर आदींनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला बहुसंख्य उपासक उपासिकांची उपस्थिती होती.

 

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *