समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रश्नासाठी सतत लढणारे पत्रकार मात्र स्वतःचे असंख्य प्रश्न सोडवू शकत नाही. हीच खरी शोकांतिका आणि वास्तव आहे. यासाठी घटनात्मक दृष्टीने जर काही प्रतिनिधित्व मिळाले तर राज्यातील हजारो पत्रकारांच्या जीवनाशी निगडित असलेले असंख्य प्रश्न मांडता येतील. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये राज्यातील अभ्यासू पत्रकाराला आमदार म्हणून नियुक्त करावे अशी मागणी आज राजभवन येथे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांच्याकडे राजकीय अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत कोरटकर,व राहुल पहुरकर यांनी केली. मुळात स्वतः पत्रकार असलेले भगतसिंग कोश्यारी यांनी संवेदनशीलपणे पत्रकारांच्या समस्या समजून घेतल्या आणि नक्कीच आपल्या मागण्यांवर विचार करू असे आश्वासन देखील दिले.
Users Today : 36