अजिंठा येथे बँक आपल्या दारी या योजना राबविण्यात आली.

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

अजिंठा गावातील सर्वांनी लाभ घ्यावा अशे आवाहन प्रदेशाध्यक्ष अरुण चव्हाण देशमुख यांनी केले

अजिंठा येथे ग्रामपंचायत कार्यालयात बँक आपल्या दारी दिनांक,15/10/2022. शनिवार रोजी अजिंठा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा यांच्यावतीने मेळावा घेऊन कृषी कर्ज योजना उद्योग व्यवसाय शेती रोजगार अपघात विमा स्टेट बँक इंडियाचे अनेक योजनेविषयी या एकदिवसीय कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन श्री सुजित झोडगे साहेब शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया अजिंठा यांनी सविस्तर माहिती दिली अनेक योजनांबाबत कर्जा बाबत ऑनलाइन फसवणूक होऊ नये म्हणून माहिती दिली तसेच एटीएम किसान क्रेडिट कार्ड कृषी स्वावलंबन योजना बचत गट कुक्कुटपालन शेळीपालन मत्स्य व्यवसाय अशा अनेक योजना विषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून श्री मेघराज चोंडीये माजी उपसरपंच श्री अरुण चव्हाण देशमुख प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य श्री विशाल देशमुख उपसरपंच अजिंठा श्री इकबाल कसम तडवी बागुल श्री प्रवीण बिऱ्हारे श्री महेबूब सर श्री अनिल दसरे श्री आजम खान ग्रामपंचायत सदस्य श्री ज्ञानेश्वर शिरसाठ ग्रामसेवक अजिंठा तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँक कर्मचारी श्री अरुण राठोड श्री शुभम तशीवाल श्री इमरान शेख श्री वाजिद खान श्री सागर मगरे तसेच गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच या योजनेअंतर्गत गावातील व परिसरातील नागरिकांनी तरुण उद्योजकांनी बचत गटातील महिलांनी शेतकरी बांधवांनी व्यापारी वर्ग भांडवलदार छोटे-मोठे व्यवसायिक बँक खातेदार व इतर सर्वांनी स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री अरुण चव्हाण देशमुख प्रदेशाध्यक्ष यांनी केले तसेच श्री सुजित झोडगे सर यांनी प्रति आव्हान केले की बँकेच्या सर्व योजनांचा सर्व बँक खातेदार यांनी

लाभ घ्यावा या एकदिवशीय कार्यशाळेच्या कार्यक्रमात वरील सर्व प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त केले

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *