छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
खुलताबाद तालुक्यातील गदाना-बोरवाडी येथील दैवत वृद्धांश्रमात मराठवाड्याच्या विविध भागांतील २६ निराधार स्त्री-पुरुष आपले जीवन या आश्रमाच्या संचालिका उमा तुपे यांच्या आधाराने जगत आहेत.कुणाला मुलांनी घराबाहेर काढले तर कुणाची पत्नी देवाघरी गेली,तर कुणाला मुलं-मुलीं असून ही वागवत नाही ,कुणाचा पती गमावला ,तर कुणी मानसिक पिडीत म्हणून कुटुंब वागवत नाही असे ६०-६५-७०वर्षाचे निराधार अत्यंत दु:खमयी,
करुणामयी जीवन संचालिका उमा तुपे यांच्या सहाऱ्यांने जगत आहेत.त्यांनी आपल्या व्यथा धोंडीराम राजपूत याना सांगितल्या . त्यांच्या व्यथा ऐकून राजपूत यांचेही हृदय पाझरले. विजयादशमी(दसरा)निमित्त मिष्ठान भोजन द्यावे असा विचार त्यांच्या मनात आला म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा पेंशनर्स संघटनेचे अध्यक्ष वसंतराव सबनीस यांच्या पासून प्रेरणा घेऊन
वैजापूर तालुका पेंशनर्स शाखेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह
राजपूत यांनी विजयादशमी(दसरा) (ता,१२) रोजी या वृद्धाश्रमातील २६निराधार वृद्धांना सकाळी नाष्टा व दुपारी गोड ,मिष्ठान जेवण दिले.जेवण पात्र बघितल्या बरोबर या सर्व वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला, त्यांचे चेहरे जेवण पाहून प्रफुल्लीत झाले.काहींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, त्यांना खूप आनंद झाला.संचालिका उमा तुपे यांचे ही हे अन्नदान पाहून व वृद्धांचे खुललेले चेहरे पाहून ऊर भरून आले.असल्याची माहिती सेवानिवृत्त धोंडीराम ध राजपूत यांनी बोलताना सांगितले आहे.