सोयगाव तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांनी दिली माहिती
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे तब्बल १ हजार २३७ अर्ज मंजूर झाले असल्याची माहित तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांनी दिली. या लाभार्थ्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वतीने मोफत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले होते. आता ‘श्रावणबाळ’चे अर्ज तर संजय गांधी निराधार योजनेचे १२३७ अर्ज मंजूर झाले, असे तहशीलचे गायब तहसीलदार चैनसिंग राजपूत व कर्मचारी राजेंद्र जाधव, शांताराम पाटील बोलताना यांनी सांगितले आहे.सोयगाव तालुक्यात गावपातळीवर श्रावण बाळ व संजय गांधी योजनेचे अर्ज तहसील कार्यालयात आले होते. शासनातर्फे निराधार, विधवा, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांगासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात.या योजनांद्वारे संबधितांना दरमहा अनुदान मिळते. त्यानुसार, ६० ते ६५ वर्ष वयोगटातील निराधार ज्येष्ठांसाठी श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना राबवली जाते. जनेंतर्गत दरमहा दिड हजार
बुधवारी १ हजार २३७ नागरिक, महिलांना व ज्येष्ठांना या योजनेचे
क्या गरजू लाभार्थीना मिळाला आधार बुधवारी एक हजार २३७ निराधारांचे अर्ज मंजुर झाले. यामुळे गरीब लाभार्थ्यांना हक्काचा आधार मिळाला असल्याचे गायब तहसीलदार चैनसिंग बहुरे यांनी बोलताना सांगितले आहे.ज्येष्ठांना औषधोपचार व इतर कारणासाठी पैशांची गरज भासत असते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनातर्फे ज्येष्ठांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना राबवली जाते. सोयगाव तालुक्यात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. श्रावण बाळ योजनेचे मुख्य उद्दिष्ट ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य्य करून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणे हे आहे.अर्ज मंजूर करण्यात आले असून, लवकर या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती सोयगाव तहसीलदार मनीषा मेने जोगदंड व गायब तहसीलदार चैनसिंग बहुरे यांनी बोलताना सांगितले आहे.