शेतकऱ्यांचे नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी;प्रा.जीवन कोलते यांची मागणी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात तालुक्यातील सावळदबारा परिसरातील गावांना मंगळवारी रात्री अचानक झालेल्या परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. कापणीला आणलेली सोयाबीन सोगुन पडलेली सोयाबीन पाण्याखाली गेत्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या पावसामुळे अनेकाची तारांबळ उडाली.शेतकरयांचे सोयाबीनच्या गंजी उघड्या असल्याने ओल्या झाल्याने खराब होण्याची शक्यता आहे.या अवकाळी पावसाने कपाशी, तूर, काही पिकांना आधार मिळाला व कापून आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकरी हवालदिल झाले आहेत व त्यात हे अवकाळी नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात निराश झाले आहे.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्चा शेतात जाऊन शासनाने पंचनामा करून योग्य ते शासन मदतीचा हात पुढे करावा अशी प्रा जीवन कोलते पाटील व शेतकऱ्यांची मागणी आहे
सावळदबारा परिसरात परतीच्या पावसाने झोडपल्याने पाण्याखाली आलेले सोयाबीन शेतात तशीच पडून आहे शेतकरी हवालदिल झाला आहे