समस्या सोडविण्यासाठी आमदारांना साकडं

Khozmaster
1 Min Read

समस्या सोडविण्यासाठी आमदारांना साकडंअकोट :तालुक्यातील आकोलखेड येथे अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे हे नुकसान पाहणीसाठी आले असता समाज क्रांती आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे यांनी आमदारांना मागणीचे निवेदन दिले.मागण्यांमध्ये प्रामुख्याने आकोलखेड शेजारील गावातील

शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकांचे जे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी. आकोलखेड येथील नागरिकांच्या जिवाच्या संरक्षणाकरीता नदीचे पाणी ज्या ठिकाणाहून फुटून गावांत शिरले त्या ठिकाणी योग्य त्या अभियंता मार्फत सर्वे करुन संरक्षण भिंत व पुल बांधण्यात यावा.गावातील पठार नदीवर ईसवा नगर जवळच्या नदीवर उंच पुल बांधण्यात यावा.गावातील ज्या लोकांचे घरे वाहून गेलीत त्यांचे अतोनात नुकसान झाले व गावातील दुकानदाराचे नुकसान झाले त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशा आशयाचे निवेदन नागरिकांच्या समक्ष देण्यात आले.

0 9 4 7 7 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *