जाळिचा देव : दि. २० नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोजित असलेल्या बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या बहुचर्चित बहुजन साहित्य संमेलन – २०२२ मध्ये प्रदान करण्यात येणाऱ्या बाल अनाथ सेवा प्रित्यर्थ जाहीर झालेल्या फुले – शाहू – आंबेडकर या बहुमानाच्या
पुरस्काराचे निवड तथा निमंत्रण पत्र आज दि. १५ – १० – २०२२ रोजी सुप्रसिद्ध जाळीचा देव येथे त्यांच्या निवासस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीत, संघाचे अध्यक्ष ॲड विजयकुमार कस्तुरे, सचिव शाहीर मनोहर पवार व संघटक/निमंत्रक बबन महामुने यांनी संतराज आंबेकर यांना सन्मानपूर्वक प्रदान केले. आंबेकर यांनी आतापर्यंत दोनशेच्यावर अनाथ बालकांना मायेचे पालकत्व उपलब्ध करून दिले असून त्यांच्या पालनपोषणासह सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.
Users Today : 20