बोगस दिव्यांग धारक कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित आधिकाऱ्यांवर कारवाई करा – प्रशांत पाटील

Khozmaster
3 Min Read

चिखली – दि.१५ ऑक्टोबर रोजी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या कडे निवेदनाद्वारे जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांच्या विषयी वारंवार माहिती मागवून ही टाळाटाळ करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे,

निवेदनात त्यांनी बुलढाणा जि.प.मधील दिव्यांग शिक्षक,विषय शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची माहिती मिळत नसल्याने

व बुलडाणा जि.प. मधील दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांची नावासहीत माहिती तसेच दिव्यांग कर्मचारी कधीपासून दिव्यांग आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यास आजपर्यंतचे शिक्षणाधिकारी टाळाटाळ करत असून जिल्ह्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने चौकशी करून त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी निवेदनात त्यांनी शिक्षक, विषय शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी नोकरी करत असतांना दिव्यांग शिक्षक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असतात तसेच दरवर्षी दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतांना दिसत आहे, आधी सुदृढ असलेले शिक्षक इतरत्र बदलून गेल्यावर दिव्यांग कसे होतात हे न उलगडणारे कोढे असल्याचे निवेदनात राज्य प्रवक्ते प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे,जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांविषयी चौकशी लावावी, तसेच शिक्षणाधिकारी यांना दिव्यांग यांची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करून दिव्यांग या यादीमध्ये जिल्ह्यातील ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये सेवापुस्तिकात नोंद असणारे व नोंद नसेल तर अश्यांना आपल्या स्तरावरून तात्काळ नोंद करण्याचे आदेश देण्यात यावे.

जिल्ह्यातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी सर्वच दिव्यांग शिक्षक सेवाज्येष्ठता यादीत येतील व जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचार्यांचा खरा आकडा समोर येईल तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षक कर्मचाऱ्यांचे दिव्यांग आहे किंवा नाही याबाबत स्वयंघोषणापत्र शिक्षणाधिकारी यांच्या कडे घेण्यात यावे अशी वारंवार मागणी करून देखील बोगस दिव्यांग शिक्षकांना तत्कालीन शिक्षणाधिकारी पानझाडे,जगताप यांनी माहिती देण्यास न्यायालयीन प्रक्रियेचे कारण समोर करत वेळकाढूपणा करत अप्रत्यक्षपणे बोगस दिव्यांग धारकांना पाठीशी घातलेले आहे व नव्याने शिक्षणाधिकारी गरोळे हे रुजू होऊन यांनी देखील अद्याप पर्यंत कुठलीही चौकशी सदर दिव्यांग धारकांची केलेली नाही गेल्या तीन वर्षांपासून रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळावा म्हणून दिव्यांग असल्याच्या बतावण्याकरून शासनाची दिशाभूल करून बदली प्रक्रियेत व इन्कम टॅक्स मध्ये फायदा घेणाऱ्याच्या विरोधात सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहोत या संदर्भात वेळोवेळी संबधीत अधिकारी यांच्याकडे तक्रारी व पाठपुरावा देखील केलेला आहे तसेच जिल्ह्यातील बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या संबंधीत विधान परिषदेत माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता तरी देखील न्यायालयीन प्रक्रियेचे कारण समोर करून बुलढाणा जि. प. मधून दिव्यांग कर्मचाऱ्यांची माहिती दिल्या गेली नव्हती,संबंधित आधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती मागुन देखील कुठे तरी बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्या जात असल्याचे आजपर्यंतच्या संबंधीत अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती वरून दिसत आहे ,परंतु आपण या विषयी योग्य ती चौकशी करून तात्काळ माहिती मागवून शिक्षणाधिकारी यांना चौकशीचे आदेश दयावे अशी मागणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी केली आहे.

 

0 9 4 6 5 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *