खासदार राहुलजी गांधींची यात्रा 17 नोव्हेंबर पासुन बुलडाणा जिल्हयात लोकषाहीसाठी जीव धोक्यात घालुन खा.राहुलजी गांधी देषवासिंयाषी संपर्क साधीत आहेत – राहुलभाउ बोंद्रे

Khozmaster
2 Min Read

चिखली: 16 सप्टेंबर 2022कॉग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेस बुलडाणा जिल्हयात साधारणतः 17 नोव्हेंबर पासुन सुरूवात होणार आहे. या यात्रेचा जिल्हयातील प्रवास शेगांव तालुक्यातुन होणार आहे. चिखली विधानसभा मतदार संघातील महत्वाच्या पदाधिका-या सोबत भारतजोडो यात्रेच्या नियाजन पूर्व तयारी संदर्भात त्यांनी संवाद साधला. देषाच्या लोकषाही साठी स्वतःचा जिव धोक्यात घालुन पदयात्रेच्या माध्यमातुन देषवासियांसाठी संपर्क साधण्या बरोबरच जातीयवादी शक्तींचा खासदार राहुलजी गांधी जनाजा काढत असल्याचे प्रतिपादन यावेळी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केले.  भारतजोडो यात्रेच्या जिल्हयात आगमन प्रसंगीच्या पुर्व नियोजन तयारीच्या अनुषंगाने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थित या महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन आज दुपारी करण्यात आले होते. बुलडाणा जिल्हयातुन तब्बल 60 कि.मी. अंतर दिनांक 17 ते 19 नोव्हेंबर या तिन दिवसात भारतजोडो यात्रा गाठणार आहे. यात्रेच्या 3500 हजार किलोमिटर पैकी 1 हजार किलोमिटरचा टप्पा खा. राहुलजी गांधी यांच्या भारतजोडो यात्रेने पार केला आहे. 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेली पदयात्रा केरळ, तामिळनाडु असा प्रवास करत आता नांदेड येथून राज्यात प्रवेष करत आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.सन 2014 सालापासुन देषात ज्या पध्दतीची राजवट सुरू आहे, त्यामुळे लोकषाही व स्वायत्त संस्था धोक्यात आल्या तसेच राज्यघटना, मुलभूत तत्व, आपल्या मतांचा अधिकार हे पुढच्या काळात राहील की नाही अषी परिस्थीती निर्माण झाली आहे. विकास कामे ठप्प झाली असुन बिघडलेली अर्थ व्यवस्था, महागाई, प्रचंड बेरोजगारी, या महत्वाच्या गोष्टींकडे मोदी सरकार लक्ष देण्याचे सोडुन अन्य गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जात आहे. मानसा मानसात, समाजात भेद निर्माण करायचा, त्यातुन मते मिळुन सत्तेवर राहण्याचा हा प्रयोग चालला आहे. या सर्व गोष्टी विरूध्द देषाला एकजुट करण्यासाठी ही भारतजोडो पदयात्रा सुरू असल्याचे राहुलभाउ बोंद्रे यांनी सांगितले.यावेळी तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष, शहर अध्यक्ष, यासह आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्य, कृउबास पदाधिकारी, तथा तालुका व शहर महिला कॉग्रेस, युवक कॉग्रेस, एन.एस.यु.आय. सेवादल, अल्पसंख्या सेल, किसान कॉग्रेस, मगासवर्गीय सेल, सोषियल मिडीया, वाहतुक सेल, सहकार सेल, डॉक्टर सेल, सोसायटी संचालक, ग्रामपंचातचे सरपंच, उपसरंपच सदस्य, यासह कॉग्रेसचे विविध विभाग सेल व फ्रटलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिीती होती.

0 9 4 6 5 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *