गवळी समाजा तर्फे आज येरवडा येथे राज्यस्तरीय वधू वर मेळावा…

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: वीरशैव लिंगायत गवळी समाज येरवडा जिल्हा पुणे तर्फे आज रविवार दि.16 ऑक्टोबर रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.     या मेळाव्यास ‘यंदा कर्तव्य असलेल्या’ वधू-वरांच्या पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे आणि सचिव अशोक यादबोले यांनी केले आहे. येरवडा येथील दक्षिणमुखी गणपती मंदिर, गणेश नगर येथे रविवारी सकाळी दहा वाजता परिचय मेळाव्याचे उद्घाटन होईल.        यावेळी प्रमुख पाहुणे म्हणूनमाजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, पुणे शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर, , नगरसेविका रूपाली बिडकर , वैशाली पहिलवान, नगरसेवक शैलेंद्र बिडकर, नारायण बहिरवाडे, ज्ञानेश्वर अंजीखाणे, वसंत नामागवळी, आदी उपस्थित राहणार आहेत.    नंदुरबार धुळे जिल्ह्यातील गवळी समाज बांधवांनी वधु वर परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे आणि सचिव अशोक यादबोले यांनी केले आहे.

 

0 9 4 9 5 9
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *