जिजामाता कॉलनी जालना येथे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण व महाप्रसादाने सांगता

Khozmaster
1 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे जालना जिजामाता कॉलनी मध्ये श्री खंडेश जनार्दन राव जाधव यांनी पारायण केले.जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जड-मुढ ताराया .निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापुन उरलें जे या जगताशी । तें तूं तत्व खरोखर निःसंशय अससी । लीलामात्रे धरिलें मानवदेहासी जयदेव होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा करूनी गणि गण गणांत बोते या भजना | धाता हरिहर गुरूवर तूंचि सुखसदना जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना जयदेव जयदेव लीला अनंत केल्या बंकट सदनास पेटविले त्या अग्नीवांचूनी चिलमेस । क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस | केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ।जयदेव जयदेव .व्याधी वारून केलें कैका संपन्न । करविले भक्तालागी विठ्ठल दर्शन । भवqसधु हा तरण्या नौका तव चरण । स्वामी दासगणूंचे मान्य करा कवन .एक दिवसीय पारायण साठी जळगाव होऊन हरिभक्त आलेले होते. अनंत कोटी ब्रम्हांडनायक गजानन महाराजांची आरती घेऊन पारायण पूर्ण झाले व दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

0 9 4 6 5 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *