मुंबई (वृत्तसंकलन) – सन 2017 ते 2020 या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन श्री. सावे यांनी केले.सन 2017-18, 2018-19 व 2019-20 या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करुन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित कालावधीत परतफेड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.यामध्ये प्राथमिकदृष्ट्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धीसाठी बँकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या विशिष्ट क्रमांकासह शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरणासाठी जावयाचे आहे. त्याठिकाणी संगणकावर दिसत असलेल्या कर्जखात्यांचा तपशील, आधार क्रमांक इत्यादी बाबींची खातरजमा करुन शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यामध्ये थेट प्रोत्साहनपर लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी बँक कर्ज खात्यास आधार क्रमांक उपलब्ध करुन दिलेला नाही. अशा शेतकऱ्यांची नावे पूर्तता झाल्यानंतर समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू आहे अशा गावातील पात्र शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आचार संहिता संपल्यानंतर समाविष्ट केली जाणार आहेत, असेही सहकार मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.मुर्तिजापूर आगाराचे चालकश्री. विनायक कुढमेथे यांनी सापडलेले पर्स केले प्रमाणिकपणे परत मूर्तिजापूर (भुषण महाजन) – मुर्तिजापूर आगाराचे चालक विनायक कुढमेथे यांना बस स्थानक परिसरात आज एका महिलेची पर्स मिळाली. ज्या मध्ये पैसे व आधार कार्ड होते. आधार कार्डावरुन कळाले की, सदर पर्स मुर्तिजापूर येथील पहाडी पुरा चे रहिवासी असलेल्या सौ. नगरे यांची असल्याच निदर्शनास आले. त्यावरुन जुनी वस्ती परिसरातील सुपरिचित व्यक्तिमत्व असलेले श्री. राजेंद्र मोहोड यांना दुरध्वनी वरून माहिती दिली. त्यांनी लागलीच त्या महिलेच्या मुलांना पाठवून आगारातून घेण्यास सांगितले. मा. आगार व्यवस्थापक यांनी त्यांच्या मुलास ती पर्स सुपूर्द केली. विशेष बा म्हणजे विनायक कुढमेठे यांनी मला कोणतीच प्रसिध्दी नको. मी एक रापम चा चालक असून मला कुठलीच प्रसिध्दी नको म्हणून न थांबता घरी निघून गेले. खरच दादांचे कौतुक करावे हे कमीच आहे.मला सार्थ अभिमान आहे की, मी रा.प.म. मध्ये माझ्या अश्या प्रामाणिक मित्रा सोबत कार्यरत आहे. आम्हा सर्वांना विनायक दादा च्या या प्रामाणिक कार्या बद्दल गर्व वाटतो असे उदगार महाराष्ट्र राज्य परिवन मंडळाचे कर्मचारी सतीश घोगरे यांनी व्यक्त केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त मार्गदर्शन अकोला (भुषण महाजन) – राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिना निमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला येथे आज मराठी भाषा वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. सुधाकर बंडु मनवर व मेघराज गणेशराव गाडग यांनी वाचन प्रेरणा दिन व मराठी भाषा साहित्या संदर्भात मार्गदर्शन केले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त मार्गदर्शन अकोला (भुषण महाजन) – राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिना निमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला येथे आज मराठी भाषा वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. सुधाकर बंडु मनवर व मेघराज गणेशराव गाडग यांनी वाचन प्रेरणा दिन व मराठी भाषा साहित्या संदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण व दिपप्रज्वलन करुन झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वृषाली महल्ले यांनी तर आभार प्रदर्शन सहायक मोटार वाहन निरीक्षण दिनेश मिठाराम एकडे यांनी केले. यावेळी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व कार्यालयीन कामकाजासाठी येणारे नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.युवा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण कलावंताना प्रोत्साहित करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा अकोला (भुषण महाजन) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुका व जिल्हास्तरावर नेहरु युवा केंद्रामार्फत युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण व तालुका स्तरावरील कलावंताना कलागुण प्रर्दशीत करण्याचे उत्तम संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहरु युवा केंद्राने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.येथील आबासाहेब खेडकर सभागृहात जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी बोलत होत्या. या महोत्सवात मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, जिल्हा समन्वयक अधिकारी गजानन महल्ले, नेहरु युवा केंद्राचे महेश सिंह शेखावत आदि उपस्थित होते.विजय देशमुख यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकारच्या आदेशानुसार नेहरु युवा केंद्राच्यामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सव राबविण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवकांनी चित्रकला, कविता, लेखन छायाचित्र, भाषण प्रतियोगीता व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी स्पर्धा घेण्यात येत आहे. यासाठी तालुकास्तरावरील चाचण्यात विजेतांना जिल्हास्तरावर निवड करण्यात आले आहे. त्यांनतर जिल्हास्तरावरील विजेतांना राज्यस्तरीय स्पर्धा तर राज्यस्तरीय विजेत्यांना राष्ट्रीयस्तरावर भाग घेता येणार आहे.जिल्हास्तरीय युवा उत्सवात विविध स्पर्धा जिल्हास्तरीय कविता स्पर्धा – प्रथम क्रमांक टिना विनोद वानखडे, व्दितीय क्रमांक पायल कडू, तृतीय क्रमांक हर्षदा इंगळे.जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा – प्रथम क्रमांक सुमित चहाटे, व्दितीय क्रमांक तनिश खोपे, तृतीय क्रमांक तृप्ती शर्मा.जिल्हास्तरीय फोटोग्रॉफी स्पर्धा – प्रथम क्रमांक साक्षी साबळे, व्दितीय क्रमांक अश्विनी भरणे, तृतीय क्रमांक सुरज डोंगरे.जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा – प्रथम क्रमांक साक्षी भोपळे, व्दितीय क्रमांक सानिया खान, तृतीय क्रमांक वैष्णवी राठोड.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल राखोंडे यांनी तर आभार प्रदर्शन नेहरु युवा केंद्राचे महेशसिंह शेखावत यांनी केले. यावेळी परिक्षक, कलाकार व प्रेषक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 27