पंचगंगा कंपनी कडून शेतकऱ्यांना बोनस वाटप मेळावा

Khozmaster
2 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा भिमराव चाटे देऊळगाव राजादेऊळगाव राजा चिखली मार्गावर एमआयडीसी एरिया पंचगंगा सीड्स कंपनी व ऑफिस आहे .तेथून बुलढाणा जालना औरंगाबाद जिल्ह्यातील 4000 शेतकऱ्यांना मागील वर्षी 7000 एकर कांदा लागवड दिली होती.तीन हजार रुपये क्विंटल ने कांदा गोट लागवडीसाठी दिला व हमीभाव 47500 रुपये ठरला होता. याव्यतिरिक्त 12,500 बोनस देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे काम पंचगंगा सीड्स कंपनीने केले आहे. व 2021 22 मध्ये एकूण 14 कोटी 94 लाख रुपये बोनस वितरित केले आहे.शेतकऱ्यांनी दिलेल्या उत्पादनावर विश्वासाची परंपरा जपली व एकूण 60 हजार रुपये प्रति क्विंटल कांदा बियाणे भाव शेतकऱ्यांना पंचगंगा कंपनीने दिला. मागील वर्ष 2020 21 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये सर्व भारतीय अर्थव्यवस्था बिघडली होती तेव्हा शेतकऱ्यांना 22500 रुपये प्रतिक्विंटल बोनस स्वरूपात देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली होती. व शेतकऱ्यांना 15 कोटी 91 लाख रुपयांचे बोनस धनादेश दिले होते.विश्वासाची परंपरा जपत पंचगंगा सीड्स कंपनीने नवनवीन वान तयार करून एकरी 15 ते 18 क्विंटल सोयाबीन व तुर बियाणे विकसित वाण तयार केले आहे.सोबतच मिरची टोमॅटो बाजरी मक्का भेंडी, वांगी हे सुद्धा कंपनी शेतकऱ्यांना देत आहे ठिबक पाईप खते देऊन वेळोवेळी शेतकऱ्यांना मानसन्मान देऊन कार्यशाळा आयोजित करत आहे आजच्या पंचगंगा शेतकरी मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार शशिकांत खेडेकर साहेब प्रमुख उपस्थिती पीएसआय सातव साहेब एडवोकेट जगदीश मीनासे साहेब एडवोकेट विघ्ने साहेब एडवोकेट रामाने साहेब एडवोकेट वायाळ साहेब दीपक बोरकर दीपक पवार अनिल चित्ते ,भिमराव चाटे प्रोडक्शन मॅनेजर भानुदास वाघ साहेब अकाउंट मॅनेजर सुरेश सातभाये साहेब तसेच सर्व पंचगंगा कर्मचारी व जवळपास 2000 शेतकरी शेतकरी मेळाव्यास हजर होते महाप्रसादाने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

 

0 9 4 6 5 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *