सतिश मवाळ मलकापूर:कृषक भारती को-ऑफ ली. तर्फे मलकापूर येथे प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रावेर मलकापूर मतदार संघाचे लोक लाडक्या खासदार श्रीमती. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून,माजी आमदार चैनसुखजी संचेती, कृभको चे विभागीय व्यवस्थापक .बिपीन चव्हाण, माजी नगराध्यक्ष विजयराव जाधव, कृभको आर.जी.बी. तुषार कोचर, कृ.उ.बा.स.चे सचिव अजय जाधव,तालुका कृषी अधिकारी राऊत साहेब,.कैलास सोमाणी जलगाव आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.या प्रसंगी विभागीय व्यवस्थापक कृभको यांनी प्रधान मंत्री कृषी समृद्धी केंद्राचे महत्त्व व उद्देश आणि शेतकऱ्यांसाठी पुरवली जाणारी विविध साधनांची माहिती दिली. तसेच आज रोजी देशभरामध्ये सहाशे कृषी समृद्धी केंद्राचे उद्घाटन कण्यात आले. तसेच आज रोजी प्रधानमंत्री मा.श्री नरेंद्रजी मोदी द्वारा एक देश एक खत व भारतीय जन उर्वरक परीयोजनेचे उद्घाटन करण्यात आले,त्या योजने अंतर्गत पूर्ण भारत देशामध्ये भारत युरिया, भारत डी.ए.पी. व भारत पोटाश या नावाने खते उपलब्ध होणार आहेत. या प्रसंगी बोलतांना मा.खासदार श्रीमती. रक्षाताई खडसे यांनी रसायन व खत मंत्रालय भारत सरकार व कृभको द्वारा सुरु केलेल्या प्रधान मंत्री कृषी समृद्धी केंद्राचा शेतकर्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच या अंतर्गत नि:शुल्क मातीपरीक्षण व नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावे असे सांगितले.माजी आमदार चैसुखजी संचेती यांनी सेंद्रिय व संतुलित खतांचा वापरा बद्दल माहिती या प्रधान मंत्री किसान समृद्धी केंद्रा मधून माहिती घ्यावी असे आवाहन केले.आजचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन कृभको चे जिल्हा अधिकारी .संदीप ढाकणे यांनी केले. व दिपिका अंग्रो सेटर चे संचालक .संदीप जाधव यांनी प्रधान मंत्री किसान समृद्धी योजने करिता मोलाचे सहकार्य केले.या प्रसंगी गजानन डवले, मोहनजी शर्मा, सुरेशसेठ संचेती, प्रसाद जाधव, रमेश तारकसे, एस.एन.फिरके, अमृत बोंबटकर,काजळे, अनिल झोपे, हरिभाऊ पाटील,वासुदेव सपकाळ,भगवान माळी,संजय नाशिक्कर,मनोज भगत,सदानंद शिंगणे व जिल्हा मधील शेतकरी तसेच विक्रेते बंधू उपस्थित होते.
Users Today : 8