ज्येष्ठ राष्ट्रीय किर्तनकार श्री गजाननराव बोंदरे, ग्रामगीताचार्य पदवीने सन्मानित

Khozmaster
1 Min Read

श्रीकांत हिवाळे नांदुरा- अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे संचलित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या ग्रामगीचार्य परीक्षा २०२२/२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्यांचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी महोत्सवात दिनांक १३/१०/२०२२ रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ राष्ट्रीय किर्तनकार तथा श्री गुरुदेव बहुउद्देशिय ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गजानन भाऊराव बोंदरे यांना या कार्यक्रमात ग्रामगीताचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधीकारी श्री लक्ष्मणरावजी गमे तर उद्घाटक म्हणून संचालक मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई बोंडे, प्रमुख अतिथी म्हणून संचालक आजिवन अध्ययन मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ डॉ. श्रीकांत पाटील,प्रचार प्रमुख श्री दामोदर पाटील, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुडे, परिक्षा विभागाचे अध्यक्ष गुलाबराव खवसे, सचिव गोपाल कडू,संघटक ॲड राघोर्ते,ग्रामगीताचार्य सौ. पौर्णिमाताई सवाई,ग्रामगीताचार्य सौ‌. विजयाताई दहेकर,यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला त्यांचे यशाचे श्रेय त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी, उपसर्वाधीकारी, सरचिटणीस, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, परिक्षा विभागाचे अध्यक्ष, सचिव, परिक्षा नियंत्रक, मार्गदर्शक ग्रामगीताचार्य श्री युवराज अढाऊ,यांचेसह सर्व जेष्ठ किर्तनकार,प्रचारक, मार्गदर्शक, परिवारातील सदस्य यांना दिले.

0 9 4 6 5 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *