चिखली: चिखली शहराच्या विकासाचा असलेला प्रचंड अनुशेष दूर करावयाचा आहे. मागील अनेक वर्षापासून चिखली नगरपालिकेत सत्ताधारी राहिलेल्या लोकांनी विकासाच्या नावावर विकास न करता चिखली शहराला केवळ ओरबडण्याचे काम केले. शहर वासियांना पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही. रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. मागील पाच वर्षात तत्कालिन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्य मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी चिखली शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला पण मागील नगराध्यक्ष पती यांनी स्वतः च कामे करून त्यात प्रचंड भ्रष्टाचार केल्याने सदर प्रकरणी चौकशी सुरू आहे. चिखली शहराचे नाव वापरून
” आय लव्ह चिखली ” असे फलक लावून शहरावर लव न करता केवळ उपभोग घेतला. परंतू आता सौ श्वेता ताई महाले पाटील या आमदार झाल्यापासून चिखली शहराच्या विकासासाठी झटत आहे. त्यांनी विवीध विकास कामांसाठी आता पर्यंत 14 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता मिळविली असून पाणी पुरवठा व इतर विकास कामांसाठी जवळपास 200 कोटी रुपयांच्यावर प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले असल्याने त्या प्रस्तावांना मान्यता घेण्यासाठी अथक प्रयत्न करीत असल्याने येत्या काही दिवसांत आ सौ श्वेता ताई महाले पाटील या चिखली शहराचे रूपडं पालटणार असल्याचा विश्वास भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश भाऊ गुप्त यांनी चिखली शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम सोहळ्या दरम्यान व्यक्त केला.
दि.17/10/2022 रोजी चिखली शहरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते पार पडला.यावेळी अध्यक्ष स्थानावरून सतिश भाऊ गुप्त बोलत होते .
चिखलीची वेगळी ओळख निर्माण करायची-आ. सौ. श्वेता ताई महाले पाटील
चिखली शहर हे बुलडाणा जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असुन राजकीय तथा व्यापारिक केंद्र आहे. शहराला एक सांस्कृतिक ओळख असुन असलेली ओळख वृध्दींगत करायची आहे. चिखली विधान सभा मतदार संघात नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे . चिखली MIDC विकसित करून स्थानिक भूमी पुत्रांना रोजगार द्यायचा आहे . तसेच चिखली शहराचा सर्वांगीण विकास करुन चिखली शहराची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे प्रतिपादन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी केले .
विविध विकासकामांचा भव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळा
या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीशजी गुप्त अध्यक्ष, दि चिखली अर्बन बँक हे होतें तर सौ. श्वेताताई महाले पाटील आमदार, चिखली विधानसभा मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यामध्ये प्रभाग १ मधील राऊत सर ते जांबुवंती नदी पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण ८.८६ लक्ष , बुलडाणा रोड ते साबिरभाई यांच्या घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण १९ लक्ष , प्रभाग २ सर्वे क्र. ६२ मातंग समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत व प्रवेशद्वाराचे बांधकाम ७९.५५
भूमिपूजन तर ,प्रभाग २ मधील डॉ. झाकीर हुसैन शाळेच्या पाठीमागील शहा यांच्या घरापासून ते हश्मा बॉस नाली बांधकाम ५ लक्ष , प्रभाग १ मधील अक्सा मस्जिद पासून हमीद भाई मणियार रस्ता बांधकाम ५ लक्ष , प्रभाग ३ शंकर घोलप ते सदाशिव फुलझाडे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम ५ लक्ष या कामांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी अॅड. विजयजी कोठारी, प्रदेश कार्यकारणी सदस्य , ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ , डॉ. प्रतापसिंह राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा , रामकृष्णदादा शेटे, अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ* , भाऊसाहेब लाहोटी, ज्येष्ठ नेते , सुरेशअप्पा खबूतरे, जेष्ठ नेते भाजप, संजय चेके पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भाजप , प्रेमराजजी भाला, सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ , रामदासभाऊ देव्हडे, ज्येष्ठ नेते , अॅड. मंगेश व्यवहारे, ज्येष्ठ भाजप नेते , पंडितदादा देशमुख, शहराध्यक्ष भाजपा , शेख अनिस भाई जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्याक आघाडी , सुरेंद्रजी पांडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य , राजाभाऊ खरात, माजी नगराध्यक्ष , सौ. विमलताई देव्हडे, माजी नगराध्यक्ष , सुहास शेटे, माजी नगराध्यक्ष ,सलीम मेमन, माजी नगराध्यक्ष, जसवंत श्रीवास्तव, माजी नगराध्यक्ष , सतीश शिंदे , राजेंद्रजी व्यास , नारायणराव खरात , हरीभाऊ परीहर, संदिप लोखंडे, दिलीप बंगड, जिल्हाध्यक्ष अनुसूचितजाती , डॉ. कृष्णकुमार सपकाळ, तालुकाध्यक्ष भाजपा , सौ. सुनीताताई भालेराव, शहराध्यक्ष महीला आघाडी , सागर पुरोहित, शहराध्यक्ष युवा मोर्चा , संतोष काळे तालुकाध्यक्ष युवा मोर्चा * अॅड. संजय सदार, तालुकाध्यक्ष लीगल सेल , हनिफ हाजी, माजी नगरसेवक , प्रा राजू गवई , सुदर्शन खरात , सौ. मंगलाताई झगडे , सौ अर्चना खबूतरे,.सौ. ममताताई बाहेती , गोविंद देव्हडे ,.विजय नकवाल , सौ. रेवतीताई कुलकर्णी , सौ. हंसाबाई अतार , नामू गुरुदासानी , अनुप महाजन , युवराज भुसारी, शहर सरचिटणीस , महेश लोणकर, शहर सरचिटणीस , सचिन कोकाटे, शहर सरचिटणीस , सुभाष अप्पा झगडे , नरेंद्र मोरवाल, शहर उपाध्यक्ष , परवेज जमदार , सादिक काझी , सचिन कुलवंत , शेख करामत सलीम परवेज यांची तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी चिखली शहर यांची उपस्थिती होती.
Users Today : 14