मुर्तिजापुर (भुषण महाजन) – हिंदू समशान भूमी (खदान परिसर) रोड ते पटवारी कॉलनी पर्यंत जाणाऱ्या रोडच्या रुंदीकरण करण्यात आले असून या रुंदीकरण साठी राजपत कन्स्ट्रक्शन कंपनी नागपूर यांच्याकडून जवळपास 200 ट्रक (माती) टाकण्यात आली. यामुळे हिंदू स्मशान भूमी येथे अंत्यंविधीसाठी व इतर विधीसाठी येणाऱ्या गाडयांच्या पार्किंगची व्यवस्था झाली. या भागात अनेक वर्षापासून विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली व त्यांचे संगोपन करण्यात आले व भविष्यात अजून झाडे लावण्याचा संकल्पना जी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक व्दारकाप्रसाद दुबे यांनी केली आहे. त्यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या रुंदीकरण व सौंदर्यकरणाच्या कार्यात नागरिकांनी सुध्दा भरभरुन साथ देत हे सर्व कार्य लोकसहभागातून सुरू आहे, व्दारकाप्रसाद दुबे यांच्या या संकल्पनेचा विडा गुलाब दुबे, महादेवराव तिरकर काका, देविदासजी गोडे, शालिग्राम यादव, नंदू भैया कनोजे ,अमोल प्रजापती यांनी सुध्दा विडा उचलला.
या सर्व कामामध्ये सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे व राजपत कंपनीचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक व्दारकाप्रसाद दुबे यांनी तर आभार मानले शिवाय राष्ट्रतेज मंडळ, सोपीनाथ मंडळ, आदर्श नवदुर्गा मंडळ यांनी सुध्दा आभार मानले. ज्या नागरिकांचे घरी झाडांचे संगोपन केल्या जाते व झाडे ठेवण्याकरिता जागा नाही अशा नागरिकांनी झाडे स्मशानभुमीत आणून दयावी. जेणे करुन हया ठिकाणी झाडांची मोठया प्रमाणात लागवड होवून पर्यावरणपुरक वातावरण मिळेल. असे आव्हान व्दारकाप्रसाद दुबे यांनी केले आहे.
शहरातील इतर भागामध्ये सुध्दा अशाच प्रकारचे सौंदर्यकरण करुन तेथे सुध्दा झाडे लावून त्यांचे योग्य रित्या संगोपन करण्याकरिता त्या भागातील पुढाऱ्यांनी व समाजसेवकांनी समोर येवून सौदर्यकरण करावे. ज्यामुळे स्वच्छ मिशन तर राबविल्या जाईल शिवाय पर्यावरणपुरक वातावरण सुध्दा मिळेल. असे मत नागरीकांनी व्यक्त केले.