चिखली आपल्या तीन दशकीय अविरत सामाजिक व संघटनात्मक समर्पित सेवा कार्यासाठी अखिल भारतीयच नव्हे तर विदेशामधे सुध्दा लोकप्रियता मिळून ज्यांना आंतर्राष्ट्रीय स्तरावर तीन मानद डॉक्टरेटसनी सन्मानित करण्यात आलेले आहे, असे मा. डॉ. शिवचरण उज्जैनकर, मुक्ताई नगर यांना आपल्या बहुजन साहित्य संघ, चिखली च्या वतीने दि.२०-११-२०२२ रोजी आयोजित बहुजन साहित्य संमेलन-२०२२ मधे प्रदान होणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकर पुरस्कार-२०२२ ने गौरवान्वित करण्यात येत असल्याबाबतचे निवड तथा निमंत्रण पत्र त्यांना दि. १५ नो. २०-११- २०२२रोजी संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे, चिखली, सचिव शाहीर मनोहर पवार तथा संघटक/निमंतक ज्येष्ठ कवी व कथाकार बबन महामुने यांनी, त्यांच्या निवासस्थानी मुक्ताई नगर येथे जाऊन त्यांना सन्मानपूर्वक बहाल केले.
Users Today : 14