सामाजिक व शैक्षणिक विकास साधण्यात सर सय्यद अहमद खान यांचे योगदान महत्त्वाचे – समतादूत मोहसिन खान

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा ( प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या बार्टी या संस्थेच्या समतादूत प्रकल्पातर्फे जि.प.उर्दू प्राथ.शाळा अंबाशी येथे दि.१७ ऑक्टोंबर रोजी सर सय्यद अहमद खान यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सर सय्यद अहमद खान यांच्या प्रतिमेस पदवीधर शिक्षक सय्यद राहत सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सय्यद राहत सर यांनी सर सय्यद अहमद खान यांच्या जीवन कार्याचा परिचय देऊन केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच बार्टीचे समतादूत मोहसिन खान बिसमिल्ला खान यांनी सर सय्यद अहमद खान हे १९ व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. तसेच भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. असे मत यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी बाबू उर्फ रहीम खा पठाण, सिद्धू महाराज, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख रहीम, हसन कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते मो.अजहर शेख वहिद, सदस्य वसीम मौलाना, सै.नासेर, सै.ईसराईल, शेख सादिक, शेख मुरसलिम, शेख चाँद कुरेशी, जावेद खान, नंदकिशोर शेजुळ, शेख कादिर इ. उपस्थित होते. सदर कार्यक्रम बुलढाणा जिल्हा सहायक प्रकल्प अधिकारी महेंद्र शामदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

0 9 4 6 6 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *