सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून पीक विमा व शासकीय मदत तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा

Khozmaster
1 Min Read

दत्ता हांडे – देऊळगाव राजा तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात पावसाने थैमान घातलेआहे सोयाबीन, कापूस व पिकांचे 100% नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला पास निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. तरी आम्ही आपल्या स्तरावरून महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की, पंचनाम्यासारखे धोरण न राबवता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा. पीक विमा कंपन्यासुद्धा आपल्या प्रतीनिधी मार्फत पंचनामा करत आहे, त्यांना सुद्धा शेतकन्यांना तात्काळ विमा देण्यास आदेशीत करावे आणि शासनाने मुद्धा लवकरात लवकर शासकीय मदत जाहीर करून शेतात ती मदत तात्काळ जमा करावी व आपल्या भागातील शेतकल्यांना न्याय देण्यात यावा अशा आशयाची मागणी करण्यात आली आहे.यावेळी राजेंद्र डोईफोडे गंगाधर जाधव रंगनाथ कोल्हे रमेश नरोडे विठ्ठल ढाकणे रतन पवार भगवान आमटे श्रीमती सरस्वती टेकाळे रेखा पवार रेणुका बुरकूल अर्पित मीनासे शिवारी बुरकूल तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 4 6 6 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *