नंदूरबार जिल्हा परिषदेत सत्तांतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ . सुप्रिया गावित तर उपाध्यक्षपदी सुहास नाईक….

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:  जि.प.च्या अध्यक्षपदी डॉ.सुप्रिया गावीत यांची निवड.       जिल्हा परिषदेत सत्तांतर, भाजपा तर्फे कॉंग्रेसला दे धक्का.    नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी राजकीय खेळी करून सत्तांतर घडवून आणले आहे. १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत जि.प.अध्यक्षपदी डॉ.सुप्रिया विजयकुमार गावीत या तर उपाध्यक्षपदी भाजप पुरस्कृत सुहास नाईक विजयी झाले आहेत.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक १७ ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. जि.प.अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे डॉ.सुप्रिया गावीत व कॉंग्रेस तर्फे विद्यमान जि.प.अध्यक्षा सिमा वळवी यांच्यात लढत झाली.यात भाजपच्या डॉ.सुप्रिया गावीत ३१ मतांनी विजयी झाल्या तर कॉंग्रेसच्या सिमा पदमाकर वळवी यांचा पराभव झाला.त्यांना २५ मते मिळाली.उपाध्यक्ष पदासाठी भाजप तर्फे पुरस्कृत सुहास नाईक व शिंदे गटाचे राम रघुवंशी यांच्यात लढत झाली.त्यात ३१ मतांनी भाजप चे सुहास नाईक विजयी झाले तर राम रघुवंशी हे पराभूत झाले आहेत. त्यांना २५ मते मिळाली.जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे २४,भाजपा २०, राष्ट्रवादी काँग्रेस ३, शिंदे गट ५, ठाकरे गट ३ असे राजकीय बलाबल आहे.   राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आधीच आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला होता.शहादा तालुक्यातील एका सदस्याने ही भाजपला साथ दिली तसेच कॉंग्रेसचे ५ सदस्य, ठाकरे गटातील २ सदस्यांनी भाजपला मतदान केले.यामुळे डॉ.सुप्रिया गावीत व सुहास नाईक यांचा विजय होऊन सत्तांतर घडून आले. कॉंग्रेसने व्हीप बजावला असताना विरोधात मतदान झाले आहे. याव्यतिरिक्त पडद्याआड अनेक राजकीय हालचाली घडल्या आहेत.

0 9 4 9 5 9
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *