जिल्हास्तर शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

Khozmaster
1 Min Read

अकोला – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा (मनपाक्षेत्र व जिल्हाक्षेत्र) २०२२-२३  चे आयोजन न्यु इंग्लिश हायस्कुल, अकोला येथे करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन  संपन्न झाले. प्रमुख अतिथी न्यु इंग्लिश हायस्कुलचे मुख्याध्यापक माधव मुंशी, बास्केटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. शिशीर देशपांडे, पुरण गंगतीरे, बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव स्वप्नील बनसोड, क्रीडा अधिकारी एम.जी.ठाकरे, प्रभु गोपनारायण आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन नंदकिशोर थुटे यांनी केले. जिल्हास्तर शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा करीता पंच म्हणून अंकुश ढोले, प्रणव अहेरकर, अमीत सांगे, कैलास बोराडे, आशिष बेलोकार, रवी काकडे, अंकीता गंगतीरे हे काम पाहत आहेत.

0 9 4 7 8 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *