अकोट :विशाल गवई अकोट दिवाळीपूर्वी अकोला जिल्ह्यातील निराधार व अपंग बांधवांना मानधन द्या अशा मागणीचे समाज क्रांती आघाडीच्या वतीने तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले. सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी स्वावलंबन योजना,श्रावण सहाय्य योजना, इंदिरा गांधी वृध्दपकाळ योजना अशा विविध योजनेंच्या माध्यमातून समाजातील वयोवृद्ध निराधार,विधवा,दिव्यांग बांधव आदी लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य स्वरुपात मानधनाचे वितरण करण्यात यावे.निराधार व अपंग बांधवांची दिवाळी कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे साजरी होईल यादृष्टीने सरकारने दिवाळीपूर्वी तातडीने मानधन वितरीत करावे.दिवाळीपूर्वी निराधार व अपंग बांधवांना मानधन द्या अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी समाज क्रांती आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे, पंजाबराव काळे,रहिमभाई कुरेशी, गणेश चौरागडे, रामेश्वर कावरे,रशीद खाँ अजीज खाँ,साबिर मिर्झा,उषा नारे,मंगला पाखरे,शेख जाफर, रामदास गव्हाळे,मधुकर कंटाळे,शकीलाबी अ.नासिर,प्रल्हाद वानखडे,अवधुत सिरसाट,शे.जाबीर शे.हुसेन, रामदास तायडे,हमीद हुसेन,शेख फारुख,माणिक इंगळे, रामभरोसे रावते,शेख रहेमान,बबन हरसुले,लक्ष्मी तायडे आदी उपस्थित होते.
Users Today : 20