अजून कोणता पुरावा द्यायचा नुकसानीचाआ.सौ.श्वेता ताई महाले यांचा संतप्त सवाल

Khozmaster
2 Min Read

सरसकट पंचनामे करण्याच्या दिल्या तहसीलदार यांना सूचना धाड : गत अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. कधी वादळी तर कधी अवकाळी , नदी नाले तुडूंब भरून वाहू लागल्याने नदी नाल्या काठाचे सोयाबिन व इतर पिके तर कधीचेच नामशेष झाले. सोयाबिन काढणी ची वेळ टळून गेली पण पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना सोयाबिन सोंगता येत नाही . ज्यांनी ज्यांनी सोयाबिन सोंगले ते सोयाबिन सडले . ज्या सोयाबिन ची काढणी झाली नाही ते पिके पाण्यात उभे आहे. काढणी झालेल्या आणि उभ्या अशा दोन्ही प्रकारच्या सोयाबीनला कोंब फुटल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यातच पंचनामे करा , आर्थिक मदत द्या अशी ओरड शेतकरी करू लागला पण प्रशासन पंचनामे करीत नाही. गत तीन दिवसांपासून मुसळधार आणि संतत धार पावसाने कहर केला असून उरले सुरले सर्व पिके हातातून गेली . प्रशासनाला हे दिसत आहे . तरी सुद्धा पंचनामे करण्यासाठीं प्रशासन कुणाची वाट पाहत आहे ? अजून कोणता पुरावा द्यायचा नुकसानीचा असा संतप्त सवाल करीत सरसकट पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी रायपूर , धाड , मासरुळ, म्हसला या परिसरात झालेल्या अती प्रचंड पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना तहसीलदार यांना दिल्या.       दि 19 ऑक्टोंबर 2022 रोजी रायपूर , धाड , मासरुळ , म्हसला बू, या महसुली मंडळात व परिसरात झालेल्या अती प्रचंड पावसाने झालेल्या नुकसानीचा रुईखेड मायंबा , चांडोळ, कुंबेफल, टाकली , म्हसला बू या गावात जाऊन पाहणी केली .      यावेळी तहसीलदार रुपेश खंदारे,यावेळी देवीदास पाटील जाधव जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, संदीप उगले पंचायत समिती सदस्य, योगेश राजपूत तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, विष्णु वाघ तालुका उपाध्यक्ष भाजपा, विष्णु उगले सरपंच, राजू चांदा, गजानन देशमुख, गजानन सपकाळ, सखाराम नेमाडे,पुरूषोत्तम भोंडे, विशाल गाजगणे, कौतिक राव ओळेकर, साहेबराव उगले, गणेश सोनूने , शिवाजी उगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..

 

0 9 4 6 0 6
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *