दिवाळी शिधावस्तू वितरण व तक्रारीसाठी संपर्क अधिकारी नियुक्त,

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त प्रत्येकी 1 किलो रवा , 1 किलो चना डाळ , 1 किलो साखर , आणि 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नस संच ( दिवाळी किट ) रुपये शंभर मात्र या दराने शासनाकडून उपलब्ध होणार आहे . दिवाळी सणासाठी प्राप्त होणारे शिधाजिन्नस पात्र शिधापत्रिकाधारकांना विहीत कालावधीत वितरीत करण्यासाठी तसेच शिधाजिन्नस बाबत तक्रार नोंदविण्यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे .  नंदुरबार तालुक्यासाठी रमेश वळवी , सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी ( ८ ९ ७५८३८०६८ ) , नवापूर पंकज खैरनार , पुरवठा निरीक्षण अधिकारी ( ८३०८ ९ ० ९ ३३१ ) , शहादा धिरज मेश्राम , पुरवठा निरीक्षण अधिकारी ( ९ ८२२८७३७७४ ) तळोदा प्रमोद डोईफोडे , पुरवठा निरीक्षण अधिकारी ( ९ ६२३३२७०७४ ) , अक्कलकुवा गुलाब बागले , पुरवठा निरीक्षण अधिकारी ( ९ ०११८ ९ ६०४ ९ ) तर अक्राणीसाठी हितेश ढाले , पुरवठा निरीक्षण अधिकारी ( ७ ९ ७२३५८३३४ ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे . सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्तभाव दुकानात जावून दिवाळीपूर्वी जाऊन ई – पॉस मशीनवर आपला अंगठा प्रमाणित करुन शिधाजिन्नस संच प्राप्त करुन घ्यावे . रास्त भाव दुकानदाराकडून शिधाजिन्नस संच ( दिवाळी किट ) घेतल्याची पावती घेवून संचात ४ पाकीट असल्याची खात्री करावी . शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नस बाबत काही तक्रार असल्यास वरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा ,   असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे

 

0 9 4 9 5 9
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *