नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा ऐतिहासिक निर्णय न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीला २२ कोटी ५ ९ लाख ३ ९ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश…

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार – : नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ग्राहक संरक्षण अधिनियम २०१ ९ अन्वये सर्वात मोठ्या रकमेचा भारतातील प्रथम व ऐतिहासिक न्याय निर्णय दिला आहे . दोंडाईचा येथील के . एस . कोल्ड स्टोरेज वेअर हाऊसला २ सप्टेंबर २०१ ९ रोजी आग लागली होती . या कोल्ड स्टोरेजच्या मालकांनी नुकसान भरपाईपोटी २५ कोटी मिळावेत यासाठी न्यु इंडिया इन्शुरन्स या कंपनीकडे दावा दाखल केला होता . मात्र मानवी हस्तक्षेपामुळे कोल्ड स्टोरेजला आग लागल्याचा ठपका ठेवत विमा कंपनीने दावा नाकारला होता . त्यानंतर कोल्ड स्टोरेजच्या मालकांने नंदुरबार येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती .   सदर प्रकरणांचे कामकाज आयोगाचे अध्यक्ष संजय बोरवाल , सदस्य भारती केतकर , मोहन बोडस यांच्या समक्ष चालले . दोन्ही पक्षाचे युक्तीवादाअंती आगीच्या नुकसानी पोटी विमा कंपनीने भरपाई म्हणून २२ कोटी ५ ९ लाख ३ ९ हजार ७४५ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यु इंडिया इन्शुरस कंपनीला दिला . एवढेच नव्हे तर मानसिक , शारीरिक त्रास तसेच तक्रार अर्जाचा खर्च ३ लाख रुपये वेगळे द्यावे असेही निकालपत्रात म्हटले आहे .  असे नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्षांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे

 

0 9 4 9 5 9
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *