अकोट प्रतिनिधी विशाल गवई शिवपुर, कासोद,बोर्डी,सुकळी या ग्रामीण भागातुन शेकडो विद्यार्थी,विद्यार्थिनी हे दररोज अकोट येथे शाळा, महाविद्यालय,औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) शिक्षण घेण्यासाठी येतात तरी या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याचे साधन हे फक्त लालपरी (बस) होती पण मागील काही दिवसांपासून या ग्रामीण भागात ढगफुटीमुळे अतिवृष्टी झाल्याने मोहाडी नदीला पुर असल्याने या भागातील काही रस्त्याचे जास्तीत जास्त नुकसान झाले आहे. तसेच या भागातील बस मार्गात सुकळी या गावाजवळून मोहाडी नदीला पूर आल्याने तेथील रस्ता खचून गेला असल्याने या भागातील बस बंद करण्यात आली आहे त्यामुळे या ग्रामीण भागात विदयार्थी वर्ग हा शिक्षण घेण्यासाठी आकोटात येऊ शकत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनी दिली असता आकोट महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कार्यकर्त्यांनी आकोट आगार प्रमुख यांच्याशी भेट घेऊन बस सेवा ही वसाडी नागापूर या रस्त्याने तात्पुरते स्वरूपात जोपर्यंत ढगफुटीमुळे खचलेला रस्ता जोपर्यंत चांगला करून सुरु होत नाही तोपर्यंत या पर्यायी मार्गावर बस सेवा सुरू करावी ही चर्चा करण्यात आली जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये याकरिता मोल्याचे सहकार्य बोर्डी ग्रामविकास अधिकारी यांनी या मार्गावर बस चालू करावी असे मागणी पत्र मनविसेचे माजी जिल्हा सचिव सुरज वर्मा यांना देवुन केले हि परिस्थिती लक्षात घेता आकोट आगार तर्फे या वरील बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन दखल घ्यावी तसेच वसाडी नागापूर या मार्गावर बस सेवा त्वरीत सुरु करावी ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कडून अकोट बस स्थानक चे आगार व्यवस्थापक मा.श्री. भाडतिलक साहेब यांना मनविसे माजी जिल्हा सचिव सुरज वर्मा निवेदनद्वारे विनंती केली आहे. हे निवेदन मनसे शहराध्यक्ष दिपक बोडखे यांच्या नेतृत्वात मनविसे तालुकाध्यक्ष आदित्य तळोकार, मनविसे ता. उपाध्यक्ष तनय अस्वार, कामगार सेनाचे अक्षय पंत,यांनी दिले. यावेळी राम काळमेघ,सौरव हागोने,ऋत्विक आंबुसकर,भुषन धर्मे,ओम भगत,राहुल रजाने,चेतन लटकुटे,श्रेयश गडम,वृतिक वानखडे,शिवम मुयांडे,अनिकेत गडम,करन अवचार,अजय भोंगे,तसेच अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 20