सी एस पी ओ राठोड व नागपुरे इन्चार्ज सलग वादग्रस्ताच्या भवऱ्यात…

Khozmaster
2 Min Read

मा.अबदुल सत्तार साहेब कुषीमञी महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिली तक्रार प्रतिनिधी संतोष गवई अकोला गेल्या 17 वर्षापासून मध्यवर्ती प्रात्यक्षिक परिक्षेत्र वनी रंभापुर येथे कर्मशाळा विभागामध्ये जाहीद खान टेक्निशियन चे काम करीत आहेत. व त्यांच्या जवळ आयटीआय सर्टिफिकेट व व्ही सी सर्टिफिकेट. सी एस पी ओ सर्टिफिकेट अशा कागदपत्र द्वारे जाहिद खान यांची नियुक्ती कर्मशाळा विभागा मध्ये करण्यात आली होती.. परंतु जेव्हापासून या विभागामध्ये नागापुरे साहेब आले. तेव्हा जाहीद खान यांना म्हणाले की तू दुसऱ्या ब्लॉक मध्ये कामाला जा व येथे काम करू नको…. परंतु जाहीद खान हे नेहमी प्रमाणे आपल्या कर्मशाळा विभागात नेहमी प्रमाणे काम करत असुन जाहीद खान यांची गैरहजेरी लावण्यात येत आहे .. व वारंवार जाहीद खान यांना तीन महिन्यापासून नागपुरे इन्चार्ज यांचा त्रास सहन करावा लागत आहे.. व अल्पसंख्यांक असलेले जाहिद खान यांच्यावर. सी एस पी ओ राठोड व नागापुरे हे अन्याय करीत असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे….. व जाहीद खान यांच्याजवळ सतरा वर्षाचा अनुभव असून सुद्धा. त्यांना कर्मशाळा विभागातून काढण्यात का येत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे?.. या अगोदर सुद्धा सी एस पी ओ राठोड व‌नागपुरे यांच्या विरुद्ध काही मजुरांनी तक्रारी केल्या होत्या. परंतु सी एस पी ओ राठोड व नागपुरे यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही…. म्हणून जाहीद खान यांनी मा. अब्दुल सत्तार साहेब कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व माननीय कुलसचिव कुलगुरू व रजिस्टर साहेब यांना तक्रार दिली यावर सी एस पी ओ राठोड साहेब व इन्चार्ज नागपूरे यांच्यावर काय कारवाई होते हे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे यावेळी जाहीद खान यांना न्याय न मिळाल्यास सहकुटुंब सहीत उपोषणाला बसणार असल्याचे व माझ्या जीवाला धोका झाल्यास सी एस पी ओ राठोड व नागपुरे हे जबाबदार राहतील असे तक्रारीत म्हटले आहे व आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे

0 8 9 4 5 7
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *