पातूर शहरात गावगुंडांचा राळा ; चाकू हल्ल्यात एक जखमी

Khozmaster
2 Min Read

पातूर पोलिसात परस्परविरोधी तक्रार दाखल पातूर : शहरातील मुख्य चौकात काल रात्री गावगुंडांच्या राळ्यामुळे काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते,यामध्ये एक जण चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.      काल दि.18/10/2020 रोजी रात्री 9:30 च्या सुमारास जुने बस स्थानक चौकातील एका गॅरेज समोर क्षुल्लक कारणावरून गावगुंडांनी चांगलाच धिंगाणा घातला.सविस्तर हकीकत अशाप्रकारे की,काल रात्री जुने बस स्थानक परिसरातील एका गॅरेज समोर स्कॉर्पिओ कारने दुचाकीला कावा मारल्यावरून दोन युवकांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला असून सदर वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.याच दरम्यान माझ्या दुचाकीस कट का मारला असे म्हणत सागर दत्तात्रय निलखन (वय 31) रा.शिर्ला,ता. पातूर याने शहजाद खान (वय 33) रा.मुजावर पुरा,पातूर याचेवर चाकूने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडताच दोन्ही गटातील युवकांची गर्दी जमल्याने जुने बस स्थानक परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान पातूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती आटोक्यात आणल्याने परिसरातील व्यवसायिक व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.          सदर घटनेत परस्परविरोधी तक्रारीत सागर दत्तात्रय निलखन यास चावा घेतल्याच्या तक्रारीवरून आरोपी शहजाद खान याचे विरुद्ध कलम 324,504,506 भादंवि नुसार गुन्हा दाखल असून शहजाद खान अहमद खान यास चाकू मारून जखमी केल्यामुळे आरोपी सागर दत्तात्रय निलखन याचे विरुद्ध कलम 307,294 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी सागर निलखन यास पातूर पोलिसांनी अटक केली तसेच जखमी शहजाद खान यास पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविले आहे.घटनेचा अधिक तपास ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस करीत आहेत.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गावगुंडांकडून तरुणांचे टोळके बनवून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून शालेय तरुणांना व्यसनाधीन करून त्यांचे आयुष्य बर्बाद करत आहेत.अशा गावगुंडांचा पोलिसांनी कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज आहे अशा प्रतिक्रिया शहरातील सर्वसामान्य नागरिकांकडून ऐकावयास मिळत आहेत.

 

0 9 4 7 8 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *