अतिवृष्टी भागाची आढावा बैठक….!

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी- बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजय भाऊ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी श्री एच.पी.तुम्मोड साहेब यांच्या दालनामध्ये अतिवृष्टी बाबत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती…! बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक तालुक्यात अतिवृष्टी होऊन पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे,मोताळा तसेच बुलडाणा तालुक्यातील सोयाबीन,तूर, कपाशी,यासारख्या उभ्या पिकाचे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान लक्षात घेऊन संवेदनशील आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी गुरुवारी नवीन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थिती बैठक घेऊन सदर बैठकीमध्ये जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार,मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, विमा अधिकारी आवर्जून उपस्थित होते..! या बैठकीनंतर अति तात्काळ सर्वे करण्यात येऊन शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचा योग्य तो मोबदला शासनाच्या माध्यमातून ताबडतोब मिळवून देण्यात येईल अशी माहिती आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी दिली…!

0 9 4 6 6 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *