मेहकर विधानसभा पक्षनेते ॲड अनंतराव वानखेडे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ॲड अनंतराव वानखेडे, मेहकर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज हजारी, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस कलीम भाई खान, भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने, सेवादलाचे राज्य सरचिटणीस शैलेश बावस्कर, माजी नगराध्यक्ष राजेश अंभोरे, मा.नगरसेवक रवी सावजी, मा.नगरसेवक संजय म्हस्के, ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष शाहू गवळी आदी मान्यवर प्रमुख उपस्थितीत विकास पवार यांची मेहकर तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती व आकाश अवसरमोल यांची मेहकर शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती तसेच मोळी येथील गणेश सहस्रबुद्धे यांची काँग्रेस बुलढाणा जिल्हा अनुसूचित जातीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना हार पुष्पगुच्छ व शाल घालून फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे जंगी सत्कार करण्यात आले. यावेळी अध्यक्षपदाहून बोलताना श्यामभाऊ उमाळकर म्हणाले विकास पवार व आकाश अवसरमोल सारख्या युवकांना काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली त्यांनी या संधीचे सोने केले पाहिजे मी अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या पदांवर काम करत इथपर्यंत पोहोचलो आहे. मला मिळालेला पदाचा मी काँग्रेस पक्षाच्या व जनतेच्या लोकभिमुख काम करण्याचा प्रयत्न केला, आपण सुद्धा सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामे करून काँग्रेस पक्ष मजबूत केला पाहिजे असे प्रतिपादन श्यामभाऊ उमाळकर यांनी केले. यावेळी युवा काँग्रेसचे शहराध्यक्ष रियाज कुरेशी, अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष विकास पवार , ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष नितीन तुपे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष युनुस पटेल, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष आकाश अवसरमोल, ॲड गोपाल पाखरे, नारायण भाऊ पचेरवाल, सुनील अंभोरे, नारायण इंगळे, आशुतोष ,सुखदेव ढाकरके, यश पडमुख, साबीर कुरेशी, आकाश पवार, उमेश पवार, सतीश सरकटे, मनोज इंगळे, गौरव इंगळे, सागर सरतापे, पवन पवार, आदर्श देवाचे, गौरव सरतापे, दीपक माने आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय वानखेडे यांनी तर आभार युवक काँग्रेसचे विधानसभा महासचिव आशुतोष तेलंग यांनी मानले
Users Today : 16