प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांचे हस्ते शहादा पोलीस ठाणे येथे वाचनालयाचे उद्घटन.. याबाबत अधिक माहिती अशी कि, महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर हे दिनांक 17 ते 19 पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणी साठी नंदुरबार येथे आले आहेत . दिनांक 19 ऑक्टोबर रोजी शहादा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या प्रकाशा पोलीस दुरक्षेत्र येथे भेट देवून दुरक्षेत्राची व परिसराची पाहणी केली तसेच दुरक्षेत्र तेथील अंमलदारांकडून आढावा घेतला . तसेच प्रकाशा दुरक्षेत्र येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवून ते करीत असलेल्या कामाकाजा बद्दल समाधान व्यक्त केले . त्यानंतर शहादा पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी , अंमलदार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी उभारण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन करुन नंदुरबार पोलीस दल हे पोलीसांसाठी व पोलीस पाल्यांसाठी करीत असलेल्या चांगल्या उपक्रमांचे कौतुक केले . पोलीस ठाणे आवारातच आधुनिक वाचनालय सुरु केल्याने शहादा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अमंलदारासोबत त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे . त्यानंतर शहादा पोलीस ठाणे येथील परिसरात महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . ” वाचनाचे मानवी जीवनातील महत्व विषद करताना , महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी सांगितले की , ” वाचनामुळे मानवी जीवनाला एक नवीन दिशा मिळते , आज पर्यंत जे काही थोर मोठे व्यक्ती होवून गेले त्यांच्या आयुष्याला वाचनामुळे कलाटणी मिळाली . वाचनामुळे मानवी जीवनात सकारात्मक बदल घडून येतात . पोलीस दलात कर्तव्य बजावित असतांना वेळात वेळ काढून नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी . वाचनालयात फक्त पुस्तकांचा संग्रह वाढवू नका , वाचनालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांचे वाचन करून स्वत : चा विकास करुन घ्या . शहादा पोलीस ठाणे येथील वाचनालयात पोलीस पाल्यांसाठी व पोलीस अंमलदारांसाठी स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक असलेले योग्य ते सर्व पुस्तके उपलब्ध आहेत . त्यामुळे पोलीस अधिकारी , अंमलदार व त्यांच्या पाल्यांनी शहादा पोलीस ठाणे येथे उद्घाटन करण्यात आलेल्या वाचनालयाचा लाभ घ्यावा , ” असे उद्घाटन प्रसंगी भाषणात सांगितले . त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक . विनय कारगांवकर यांनी उप विभागीय कार्यालय शहादा येथे भेट देवून कार्यालयाची व परिसराची पाहणी केली तसेच शहादा उप विभागीय पोलीस अधिकारी , श्रीकांत घुमरे यांचे कडून त्यांनी उप विभागातील पोलीस ठाण्यांचा कामकाजाचा थोडक्यात आढावा घेतला . शहादा उप विभागाच्या कामाकाजा बाबत उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांना महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी योग्य त्या सुचना देवून त्यांनी शहादा उप विभागाच्या कामाकाजाबद्दल समाधान व्यक्त केले . सदर कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे , शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत , स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार , सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ तसेच शहादा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार उपस्थित होते .
Users Today : 131