ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पराभवाच्या रागातून चौघांना मारहाण ; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नदुरबार -:ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पराभव झाल्याचा राग येवून एकाला घरात घुसून लाठ्या काठ्यांसह लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली . या मारहाणीत चार जण जखमी झाले आहे . तसेच संशयीतांनी घराच्या कुडाच्या कंपाऊंडची तोडफोड करीत नुकसान करुन घराला आग लावून दिली . याप्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . धडगाव तालुक्यातील अस्तंबाचा दोदमापाडा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांची निवडून पार पडली . या निवडणूकीत पराभूत झाल्याने गावात गैरकायद्याने मंडळी जमविण्यात आली .   तसेच बैठकीतील लोकांशी संगनमत करुन धिरसिंग कोचऱ्या वळवी या संशयीताच्या पॅनेल मधील उमेदवार व सरपंच पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला . याचा राग आल्याने 12 जणांनी पोपटा गिंब्या वसावे यांच्या घरी जावून अंगणात लाठ्याकाठ्यासह लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करण्यात आली . यावेळी झालेल्या मारहाणीत पोपटा वसावे यांच्यासह फोज्या हांद्या वळवी , जयसिंग रुप्या वळवी , दिनेश नोवा वळवी हे चार जण जखमी झाले . तसेच घराच्या कुडाचे कंपाऊंड , खुर्च्यासह छत्रीच्या कॅमेऱ्यांची तोडफोड करुन नुकसान करण्यात आली .   तसेच घराला आग लावून जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली .     याबाबत पोपटा गिंब्या वसावे यांनी धडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार धिरसिंग कोचऱ्या वळवी , हावका ओल्या वळवी , इंद्या ओल्या वळवी , दिनेश आवका वळवी , राहूल फोज्या वळवी , संदीप फोज्या वळवी , फोज्या खाअल्या वळवी , किरण फोज्या वळवी , नारसिंग सायसिंग वळवी , अमर तुमड्या वळवी , स्वप्नील तुमड्या वळवी , माधव फोज्या वळवी या 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण महाले करीत आहे .

 

0 9 4 9 4 8
Users Today : 120
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *