आता विद्यार्थी देणार नागरिकांना स्वच्छतेबाबतचे धडे! जिल्ह्यातील सर्व शाळात लेट्स चेंज – स्वच्छता मॉनिटर प्रकल्प सुरु.

Khozmaster
2 Min Read

देवेंद्र सिरसाट.नागपूर.    कळत नकळत होणाऱ्या कचऱ्याच्या बाबतीतल्या निष्काळजीपणाची असामाजिक सवय आटोक्यात आणून कायमस्वरूपी मोडून काढण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून अर्थात २ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत राज्यभरात लेट्स चेंज – स्वच्छता मॉनिटर प्रकल्प राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातही या प्रकल्पाची अंमलबजावनी होत असून, यामाध्यमातून बेजबाबदारपणे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांना आता स्वच्छतेबाबत विद्यार्थी धडे देणार आहे. या स्वच्छता दूतांचा जिल्हास्तरावरुन प्रमाणपत्र देऊन गौरवही होणार आहे.       राज्यात सर्व शाळांमध्ये २ऑक्टोबर पासून लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर प्रकल्प सुरु झाला आहे. हा प्रकल्प विद्यार्थ्यांकडून साफ सफाई करून घेणे किंव्हा रॅली काढणे, स्वच्छता विषयी निबंध / चित्रकला स्पर्धा आदी भरवण्याचा नाही आहे. ह्या प्रकल्पात १० नोव्हेंबरपर्यंत ५ ते ८ चे सर्व विद्यार्थी ‘मॉनिटर’ बनून निष्काळजीपणे कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्यांना, इतरत्र कचरा टाकणाऱ्यांना थांबवून त्यांची ती चूक त्यांच्या निदर्शनात आणून देणे असा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातीलही जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, विना अनुदानीत आदी माध्यमांच्या ४०५० वर शाळांमध्ये या उपक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विडिओ संदेशाद्वारे प्रकल्पची कल्पना मांडली आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायला लेट्स चेंज या गंम्मतशीर चित्रपटाची लिंक पाठवण्यात आली आहे. सर्व शाळांना विद्यार्थ्यांसाठी दिवाळी प्रोजेक्ट म्हणून चित्रपट पाहून प्रेरणा घेणे आणि निष्काळजीपणामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणिऱ्यांना थांबवून येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवांचे संक्षिप्त विवरण लिहिण्याचे सूचित करण्यात आले आहे. तर नागपूर जिल्ह्यात या प्रकल्पासाठी प्राथमिक शिक्षण विभागासाठी जिल्हा समन्वयक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सुजाता आगरकर व माध्यमिक करिता प्रभारी उपशिक्षणाधिकारी सुशिल बनसोड हे काम सांभाळत आहे. त्यांनी सांगितले की, अनेक शाळा सक्रिय झाल्या असून, सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक शाळेमध्ये संपर्क करून अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत असे सांगितले..उत्तर कामगिरी करणारा विद्यार्थी होणार जिल्हा स्वच्छता मॉनिटर विद्यार्थ्यांनी ही स्वच्छता मॉनिटरगिरी शाळेत किंवा घरा जवळच नाही, तर सर्व ठिकाणी करणे अपेक्षित आहे. असे करताना ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया अनुभवतील. ह्या अनुभवाचं संक्षिप्त वर्णनं स्वच्छता मॉनिटर लावून ते स्वत: किंवा त्यांचे पालक अथवा शिक्षक स्वच्छता मॉनिटरच्या फोटो सहित सोशल मीडिया वर शेर करतील. १० नोव्हेंबरपर्यंत सर्व विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर असतील. त्या नंतर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडून त्यांना प्रमाणपत्र देऊन जिल्हा स्वच्छता मॉनिटर होण्याची संधी मिळेल.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *