आदिवासींना रोजगार उपलब्ध करून स्थलांतराचा प्रश्न सोडवणार : आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित…

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार- : आदिवासींच्या शिक्षण , आरोग्य व उपजीविका या तीन महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यासाठी आम्ही करीत आहोत . काम प्रश्न आदिवासींच्या स्थलांतराचा कायमस्वरूपी स्थानिक सोडविण्यासाठी ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणार ‘ , असे आदिवासी विकास मंत्री डॉ . विजयकुमार गावित यांनी सांगितले . आज आदिवासी विकास मंत्री डॉ . विजयकुमार गावित यांच्या अध्यक्ष ते खाली संसदीय संकुल विकास क्षेत्रातील आदिवासी विकास योजनांचा आढावा बैठक झाली . त्यावेळी ते बोलत होते . जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा . समीरजी उराव , योजक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ . गजानन डांगे , खा . अशोक नेते ,खा . डॉ . हिना गावीत , आमदार अशोक उईके , आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदिप व्यास , आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे , नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी . आदी या बैठकीस उपस्थित होते . नंदुरबार व धुळे लोकसभा क्षेत्रातील नटावद संकुल , दिंडोरी लोकसभा क्षेत्रातील भोरमाळ संकुल , गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील चातगाव या संकुलांचा आढावा व आदिवासी क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्यात आली .   तसेच आदिवासी विकास योजनांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला . मंत्री डॉ . गावित म्हणाले , आदिवासी औद्योगिक समूहांतर्गत आदिवासी उद्योजकांना एकाच छताखाली सुविधा उपलब्ध करून आदिवासी समाजात उद्योजकता विकासघडवून आणणे , हा आमचा उद्देश आहे राज्यातील अनेक आदिवासी बांधव रोजगारासाठी स्थलांतर करतात . त्यांना राहत्या ठिकाणी काही छोटे मोठे व्यवसाय उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे . तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू . यासाठी राज्यातील सर्वच आदिवासी कुटुंबांचे सर्वेक्षण करणे सुरु आहे ‘ , असेही डॉ . गावित यांनी सांगितले . आदिवासी युवक- युवतींना शिक्षण व व्यवसाय प्रशिक्षणासाठी पोर्टल तयार करण्याचे काम सुरू आहे . आदिवासीबहुल गावांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रधानमंत्री आदर्श ग्राम विकास योजना एक चांगली संकल्पना महाराष्ट्रातील आदिवासीबहुल गावामध्ये राबविण्यात येत आहे . जिल्हास्तरावर याबाबत बैठका घेण्यात येत आहेत . आदिवासींच्या मूलभूत समस्या व प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत ‘ , असे डॉ . गावित यांनी सांगितले . ‘ नेट शेड वितरित करणे तसेच आदिवासी हस्तकला , कौशल्य विकास प्रशिक्षण , कृषी प्रक्रिया उद्योग उभारणी , शेतमालाची स्वच्छता , वर्गीकरण आणि पॅकींग सुविधा , तसेच निर्यातीस चालना देण्याकरिता सहाय्य आणि प्रशिक्षण आदिवासी बांधवांना देण्यात येईल .   आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कालबध्द कार्यक्रमाचा कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्याची 100 टक्के अंमलबजावणी करण्यात येणार आहे , असे मंत्री डॉ . विजयकुमार गावित यांनी सांगितले .

 

0 9 4 9 4 9
Users Today : 121
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *