प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:शहादा येथील ज्वलेर्सचे दुकान फोडणाऱ्या 02 आरोपीतांना 24 तासाच्या आत 5 किलो चांदीच्या मुद्देमालासह अटक. याबाबत अधिक माहिती अशी कि, महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक. विनय कारगांवकर हे दि. 17 ऑक्टोबर ते दि. 19 ऑक्टोबर रोजी पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले होते . दिनांक. 19 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक . विनय कारगांवकर हे शहादा येथे तपासणी साठी आले असता तक्रारदार प्रतिक पवनकुमार गेलंडा (वय- 28) व्यवसाय – व्यापार रा- तेरापंती भवन लक्ष्मीनगर शहादा हे शहादा पोलीस ठाणे येथे आले . त्यांनी त्यांचे रत्नलाभ ज्वेलर्स या दुकानातुन 5 किलो वजनाचे चांदीचे दागिने हे दुकानाची मागील भिंत फोडुन त्यातुन छतावर चढुन तसेच छताचे स्लॅप फोडुन दुकानाच्या आत प्रवेश करुन घरफोडी केल्याचे सांगितले . तसेच मोहम्मद साजिद खत्री यांचे पेहनावा फॅशन या कापडाचे दुकानातुन देखील 15 हजार रुपये अज्ञात चोरटयाने चोरी केल्याचे सांगितले . त्यांचे तक्रारी वरुन शहादा पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द् दि. 19 ऑक्टोबर रोजी गु.र.नं. 638/2022 भादवि कलम 457,380 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता . महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक . विनय कारगांवकर यांनी तसेच नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक . पी . आर . पाटील यांनी शहादा येथे घडलेल्या दोन घटनांची गांभीर्याने दखल घेतली . तसेच स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देवून आरोपीत व मुद्देमाल हस्तगत करणे बाबत निर्देश दिले . सदर घटने बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ 03 पथके तयार केली . त्यातील 02 पथके ही दोंडाईचा व खेतीया परिसरामध्ये रवाना केली . तसेच 01 पथक हे गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषण करीत होते . पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , शहादा येथील झालेल्या घरफोडीतील आरोपी पैकी एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन तो प्रेस मारुती मंदिर जवळ राहत आहे . सदर ची बातमी त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिली . स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ प्रेस मारुती मंदिरा जवळ रवाना झाले . तसेच प्रेस मारुती मंदिरा जवळ राहात असलेल्या सराईत गुन्हेगाराबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता अली ऊर्फ बबलू हा सराईत आरोपी प्रेस मारुती मंदिरा जवळ राहत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेला बातमीदारमार्फत समजले . प्रेस मारुती मंदिरा जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत सावधानता बाळगत सापळा रचला , परंतु संशयीत आरोपी अली ऊर्फ बबलू हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे आपण पोलीसांच्या सापळ्यात अडकलो असल्याचे लक्षात येताच संशयीत आरोपी अली ऊर्फ बबलू याने तेथून पळुन जाण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले . त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अली ऊर्फ बबलू खान अफजल खान पठाण (वय 21) वर्षे रा :- प्रेस मारुती मंदिरा जवळ , शहादा ता . शहादा जि . नंदुरबार असे सांगितले . अली ऊर्फ बबलू यास शहादा पोलीस ठाणे येथे आणून ज्वेलरीच्या दुकानातील घरफोडी बाबत विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला . त्यास कौशल्यपूर्वक विचारपुस केली असता त्याने ज्वेलर्सच्या घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली . तसेच त्याच्या बरोबर दुसरा साथीदार विक्की संजय सुर्यवंशी (वय 22) रा.-: सालदार नगर , शहादा ता . शहादा जि . नंदुरबार हा असल्याचे सांगितले . त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सालदार नगर येथुन ताब्यात घेतले . त्यांचे कडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी पेहनावा फॅशन या कपडयाच्या दुकानात देखील चोरी केल्याची कबुली दिली . तसेच घरफोडी केलेल्या चांदीच्या दागिन्यांबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करुन 3 लाख रुपये किमतीचे 5 किलो वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले . ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करीत आहोत तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपीतांकडून शहादा व आजुबाजुच्या परिसरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे. पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले . सदर ची कामगिरी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पो. निरीक्षक . संदीप पाटील , पो. हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक विकास कापुरे , पोलीस कॉन्सटेबल विजय धनसुखलाल ढिवरे यांच्या पथकाने केली आहे .पोलीस अधीक्षक . पी . आर . पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की , सध्या दिपावलीचा उत्सव असल्याने सर्व नागरीकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी . तसेच घरातून बाहेर किंवा परगावी जातांना घर व्यवस्थित बंद असल्याची खात्री करावी . तसेच शेजारील व्यक्तीला त्याबाबत कल्पना द्यावी . कोणीही संशयास्पद व्यक्ती आपल्या घरा जवळ किंवा आजुबाजुच्या परिसरात दिसुन आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला अथवा डायल 112 क्रमांकावर संपर्क करुन कळवावे .( पी . आर . पाटील भा . पो.से. ) पोलीस अधीक्षक , नंदुरबार
Users Today : 121