पुन्हा एकदा “खाकी वर्दीतील माणूसकीचे दर्शन
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: जिल्ह्यात कोरोनाच्या साधारण शेवटच्या टप्प्यात एका बँक अधिकाऱ्यावर रात्रीच्या प्रवासात अचानक आलेला प्रसंग अन् चोरट्यांशी सामना भयावक होता. यावेळी समय सूचक राखत बँक अधिकाऱ्याने खाकी वर्दीतल्या त्याचे परिचित असलेले पोलीस अधिकारी यांना घडलेली आपबीती सांगितली अन् खाकी वर्दीतील त्या माणसाने ही कुठलीही वेळ न गमावता लागलीच आपल्या सहकाऱ्यांना सूचना देऊन संबंधित पोलीस स्टेशनची संपर्क साधून त्याबाबत माहिती देऊन एका बँक अधिकाऱ्याचा जीव व त्यासोबत असलेला मुद्देमाल वाचविला.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, जुन 2021 च्या रात्रीच्या सुमारास बँक अधिकाऱ्यावर घडलेली आपबीती. पुन्हा एकदा ” खाकी वर्दीतील माणूसकीचे दर्शन. वेळ रात्रीची साधारण १०.३०.वाजेची!! विशेष म्हणजे अमावस्येची रात्र!!चांदण्यांच्या प्रकाशात त्यांची स्वतःची गाडी सर्व्हिसींग ला जळगाव येथे सोडून परत बसने जळगाव ते धुळे असा प्रवास झाला. धुळे येथून नंदुरबार ला जाणारी बस दोन तास वाट पाहूनही न आल्यामुळे बँक डेप्युटी मॅनेजर हे दोंडाईचा येथील बसने दोंडाईचा बसस्टॅन्ड येथे सायंकाळी साधारण 8.30 सुमारास पोहोचले. दोंडाईचा येथे रात्री 10 वाजे पर्यंत नंदुरबार मध्ये जाणारी बस न आल्यामुळे अखेरीस डेप्युटी मॅनेजर यांनी सकाळी दुसऱ्या दिवशी त्यांना बँकेत महत्त्वाची कामे असल्यामुळे त्यांनी रिक्षातून जाण्याचा निर्णय घेतला. ते बस वर विसंबून होते परंतु कोविडच्या केसेस थोड्या कमी होत असल्याने एसटी बसच्या फेऱ्या तुरळक प्रमाणात सुरू होत्या. तर त्यादिवशी नंदुरबार आगारातून पुरेसे प्रवासी नसल्याने सायंकाळी बस निघालीच नव्हती. दोन तासांनंतरही बस न आल्यामुळे दोंडाईचा ते नंदुरबार जरा जोखमीचा प्रवास रिक्षा ने करण्यासाठी बँक डेप्युटी मॅनेजर हे निघाले तर त्या रात्री चांदण्यांच्या प्रकाशात अर्धा प्रवास झाल्यानंतर अचानक दुचाकी वरून दोन संशयास्पद तरूण रिक्षासमोर आले. आणि रिक्षावाल्याला विचारलं “नंदुरबार ला चालले का? थांबा आम्हाला पण यायचंय!!” ते ऐकून रिक्षावाल्याने वेग कमी केला. ते दुचाकीस्वार थांबले आणि त्यांच्या पैकी एक जण खिशातून काही तरी काढत आहे असं त्यांना जाणवले. गळ्यात सोन्याची चेन, अंगठी आणि रोख रक्कम धरून साधारण लाखभर रुपयांचा ऐवज बँक अधिकाऱ्याकडे होता. त्यावेळी त्यांनी क्षणार्धात रिक्षावाल्याला सांगितले की, ” तू थांबू नकोस, रिक्षा पळव...” असे सांगितले यानंतर बँक अधिकारी यांनी तत्काळ नंदुरबार येथील पोलीस ठाण्याचे त्यांचे परिचित पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि सदर घडलेली आपबीती सांगितली. पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील यांनी बँकेच्या अधिकाऱ्यास लागलीच लोकेशन विचारले आणि त्यांना पोलीस पेट्रोलिंग व्हॅन शी कनेक्ट करून दिले. पुढे पाच किलोमीटर अंतरावर व्हॅन त्यांची वाट पाहत होती. आणि त्यात बँक अधिकारी हे सुखरूप घरी पोहोचले”. पोलिस शक्यतो मदत करत नाहीत किंवा गुन्हा घडल्यानंतर येतात आणि वर पैसे उकळतात असा काहीहीसा अनुभव बँक अधिकाऱ्यास त्यादिवशी आला नाही आणि त्याउलट बँक अधिकाऱ्याच्या संरक्षणासाठी पोलिस व्हॅन येऊन थांबली हे पाहून बँक अधिकारी भारावले कोणी व्हीआयपी असणार हे समजून रिक्षावाल्याने ही त्यांचा मोबाईल नंबर मागितला. त्यादिवशी खाकी वर्दीतल्या “माणसाची” त्यांना ओळख झाली. सलाम त्या पोलीस अधिकाऱ्यांना खरंच नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस हे अनेकदा देवदूतच ठरतात,असा काहीसा अनुभव बँकेचे अधिकारी मयूर दत्तात्रेय पाटे यांना आला आहे.
मयूर दत्तात्रेय पाटे हे त्यावेळी शहादा येथे एस बी आय बँक शाखेचे डेप्युटी मॅनेजर होते. नंदुरबार येथे त्यांचे वास्तव्य होते., आता त्यांची बदली औरंगाबाद येथे मॅनेजर म्हणून झाली आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक. पी. आर. पाटील , नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक, प्रविण पाटील तसेज पेट्रोलिंग पोलीस कर्मचारी..
मयूर दत्तात्रेय पाटे यांनी सर्व पोलीस अधिकारी यांचे आभार मानले…
Users Today : 120